कोटक लाईफ इन्शुरन्सतर्फे कोटक जेन २ जेन प्रोटेक्ट योजनेचा शुभारंभ

कोटक महिंद्रा लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (“कोटक लाइफ”) ने आज त्यांची कोटक जेन २ जेन प्रोटेक्ट ही नवीन संरक्षण योजना सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. ही योजना दोन पिढ्यांना एकाच योजनेत संरक्षणरुपी विमाकवच देण्याचा पर्याय देत आहे. विमा उद्योगात प्रथमच असा पर्याय सादर केला जात आहे. अशा प्रकारे कोटकची ही योजना विमारुपी संरक्षण कवचाचा वारसा पुढच्या पिढीला हस्तांतरीत करत आहे.

विमाधारकाच्या हयातीनंतर प्रीमियम लाभाचा १०० टक्के खात्रीशीर परतावा देणाऱ्या कोटक जेन २ जेन प्रोटेक्ट योजनेत जेव्हा पालक (प्राथमिक जीवन विमाधारक) वयाची साठ किंवा पासष्ट वर्षे पूर्ण करतात तेव्हा संपूर्ण जोखीम संरक्षण मुलाला हस्तांतरित करण्याची लवचिकता ही योजना पालकांना देते. याव्यतिरिक्त, हे जोखीम कवच मुलाच्या वयाच्या साठव्या वर्षापर्यंत टिकते.

ही योजना अनेक प्रकारचे विस्तृत संरक्षण कवच प्रदान करते. त्यात सुदृढ आरोग्य राखल्याबद्दल लाभ, अपघाती मृत्यू लाभ, कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास लाभ तसेच गंभीर आजारात मदत यासारखे पुरक लाभही विमाधारकास प्रदान केले जातात. महिला विमाधारकांसाठी कोटक जेन २ जेन प्रोटेक्ट योजना अतिरिक्त पाच टक्क्याचा मृत्यूलाभही प्रदान करते.

नवीन योजनेबद्दल टिप्पणी करताना कोटक महिंद्र लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे एमडी महेश बालसुब्रमण्यियन म्हणाले, ”एक संस्था म्हणून ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा अधिक काही प्रदान करणारे नाविन्यपुर्ण आणि त्यांच्या हिताची काळजी घेणाऱ्या योजना सादर करणे हे आमचे अतुट समर्पण प्रकट करते. कोटक जेन २ जेन प्रोटेक्ट या योजनेतून आमचे ग्राहक त्यांच्या दोन पिढ्यांना एकाच टर्म योजनेतून संरक्षण कवच प्रदान करु शकतात.

या योजनेचे सार आपण भारतीयांनी कुटुंब, परंपरा आणि वारसा याला दिलेले महत्त्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत मूल्ये, ज्ञान आणि शिकवण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही तत्वे खोलवर रुजलेली आहे. ही योजना या मूल्यांचे सार उत्तमरित्या समजते. मला खात्री आहे की कोटक जेन २ जेन प्रोटेक्टसारखी नाविन्यपूर्ण उत्पादने विमारुपी संरक्षण श्रेणीचा विस्तार करतील आणि २०४७ पर्यंत ‘सर्वांसाठी विमा’ या आयआरडीएआय (IRDAI) च्या दृष्टीकोनात महत्त्वपूर्ण योगदान देतील.”