पुण्यात नक्की काय घडतंय? २८ आणि २९ मे रोजी सारसबाग उद्यान राहणार बंद

By: Editor_Pratik

On: Tuesday, May 26, 2026 5:32 PM

Google News
Follow Us

कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

पुणे : पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांनी संपूर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग उद्यान २८ मे व २९ मे २०२६ रोजी सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे यांनी दिली.

प्रशासनाच्या या निर्णयामुळे दोन दिवस नागरिकांना सारसबाग उद्यानात प्रवेश करता येणार नाही. संभाव्य गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापौर नागपुरे यांनी नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने जारी करण्यात आलेल्या आदेशांचे पालन करावे, असेही सांगितले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 20, 2026

August 20, 2026

August 20, 2026

August 20, 2026

August 20, 2026

August 14, 2026