पुणे : शहरातील फॅशनविश्वाला ग्लॅमर आणि स्टाइलची नवी झळाळी देणारा ‘रनवे हाइस्ट सीझन-२’ हा भव्य सोहळा २४ मे २०२६ रोजी हिंजवडी येथील रॅडिसन ब्लू हॉटेल पुणे हिंजवडी येथे उत्साहात पार पडला. पूजा सिंह यांच्या संकल्पनेतून आणि दिवा पेजंट्सच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने पुण्यातील फॅशनप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले.
देशभरातील ५० हून अधिक मॉडेल्सनी आकर्षक पदभ्रमण सादर करत आपल्या अदाकारीची मोहिनी उपस्थितांवर घातली. कार्यक्रमात विविध नामांकित वेशभूषाकार आणि वस्त्रसंग्रहांनी विशेष दाद मिळवली. डोर – ड्रेस ऑन रेंट, बीइंग डिझायनर सिमी, पोश, पुष्पांचल, रॉयल टास्टा तसेच प्रियांका दुबे यांच्या आकर्षक आणि आधुनिक वस्त्रसंग्रहाने उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्यात अनुपमा सिंह, रिधमा काकाणी, लता पांडे, निशा यादव, नीलू मेहता, रेखा पलाडी, आरती बोरोले, मेहर इक्बाल आणि अभिज्ञा खोबरागडे यांनी मोहक उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाची रंगत अधिक वाढवली.
भव्य सादरीकरण, आकर्षक पदप्रदर्शन, मान्यवरांची उपस्थिती आणि आलिशान वातावरणामुळे हा सोहळा पुण्यातील वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या कार्यक्रमांपैकी एक ठरला.





