पर्यावरणीय शाश्वततेला चालना देण्यासाठी हंगामा डिजिटल मीडिया आणि भामला फाऊंडेशनने ‘भूमी नमस्कार’गाणे केले लॉन्च

हंगामा डिजिटल मीडिया आणि भामला फाऊंडेशन यांनी नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बहुप्रतिक्षित ‘भूमी नमस्कार‘ गीताच्या सादरीकरणाची घोषणा केली. या कार्यक्रमाला भामला फाऊंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला, हंगामा डिजिटल मिडियाचे संस्थापक नीरज रॉय प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अन्य प्रसिद्ध व्यक्तींमध्ये आर. बाल्की, शान, प्रसून जोशी, भूमी पेडणेकर, शंकर महादेवन, शेखर रवजियानी, श्यामक डावर आणि निती मोहन उपस्थित होते.

‘भूमी नमस्कार‘ गीत पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरणाशी ताळमेळ साधणाऱ्या जीवनशैलीच्या महत्वाबाबत जागरूकता निर्माण करणारी एक उत्तम संकल्पना आहे. या प्रेरणामय गीतासाठी चित्रपट क्षेत्रातील अनेक प्रतिभावंत आणि सन्माननीय व्यक्ती एकत्र आल्या आणि या सर्वांनीच हे उत्तम कार्य पुढे नेण्यासाठी आपला आवाज आणि सर्जनशील ऊर्जा दिली. या गीताचे शब्द, निसर्गाशी ताळमेळ साधून राहण्याची शिकवण देणारे, पर्यावरण रक्षणाच्या गरजेवर भर देणारे आणि निसर्गाशी ताळमेळ साधून राहणाऱ्या जीवनशैलीमुळे होणारे फायदे सांगणारे आहेत.

या गीताच्या संगीतात विविध शैलिंचा प्रभाव आहे आणि पर्यावरणाची देखभाल जगातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असल्याचे हे गीत सांगते. प्रसिद्ध व्यक्तींना एकाच मंचावर आणून ‘भूमी नमस्कार‘ हे गीत पृथ्वीची देखभाल करणे किती गरजेचे आहे इतकेच सांगत नाही तर लोकांना आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणादेखील देते.

हंगामा डिजिटल मिडियाचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक नीरज रॉय यावेळी म्हणाले की, “जर आपल्याला पर्यावरण बदलाच्या प्रतिकूल प्रभावाला कमी करायचे असेल तर आपल्या परिसंस्थेला पुन्हा पहिल्यासारखे करावे लागेल, यावर ‘भूमी नमस्कार’ अभियान भर देते. या अभियानाचा उद्देश नैसर्गिक स्थितीच्या रक्षणासाठी वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर जागरूकता आणणे, हा आहे. भामला फाऊंडेशनबरोबरचे आमचे सहकार्य पर्यावरण संरक्षण आणि निसर्गाशी ताळमेळ साधणाऱ्या जीवनशैलीचा पुरस्कार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे.”

या अभियानाविषयी भामला फाऊंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला म्हणाले की, “ पर्यावरणाशी ताळमेळ साधणारी जीवनशैली आणि पर्यावरणाबाबत जागरूकतेेचा पुरस्कार करणाऱ्या आमच्या उद्दीष्टांशी अनुरूप अशी भूमी नमस्कार गीत ही एक उत्तम संकल्पना आहे. गीत – संगीताच्या माध्यमातून लोकांच्या मनात याविषयीची प्रेरणा जिवंत करण्यासाठी या सर्वच प्रतिभावंतानी एकत्र आल्याचे पाहणे उत्साह वाढवणारी बाब आहे.

आम्हाला वाटते की, या गीताच्या माध्यमातून आपल्या या पृथ्वीच्या उत्कृष्टतेसाठी प्रयत्न केले पाहिजे, याची शिकवण लोकांना दिली जाऊ शकते. आम्ही पुन्हा एकदा हंगामाबरोबर एकत्र येऊन काम केल्याने आमच्या मनात आनंदाची भावना आहे.”

गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे उपाध्यक्ष आणि हेड – कॉर्पोरेट ब्रँड व कम्युनिकेशन, सुजित पाटील म्हणाले की, “गोदरेज इंडस्ट्रीजमध्ये पर्यावरणाबाबतची जबाबदारी केवळ घोषणाबाजीसाठी नसून हे एक महत्त्वाचे मूल्य आहे, जे आमच्या प्रत्येक गतिविधीला दिशा देण्याचे काम करते. आम्ही आमच्या व्यवसायाच्या प्रत्येक पैलूमध्ये निसर्गाची विशेषत्वाने काळजी घेतो. यामध्ये निसर्गाशी अनुरूप उत्पादनांचा समावेश आहे.

भामला फाऊंडेशनच्या ‘भूमी नमस्कार‘ अभियानाला सहकार्य करण्याच्या माध्यमातून आमचा उद्देश जागरूकता वाढवणे आणि पर्यावरण सुस्थितीच्या दिशेने पावले उचलण्यासाठी सर्वांना प्रेरित करण्याचा आहे. हे गीत या महत्त्वाच्या मुद्द्यांवर म्हणणे मांडण्यासाठी सर्जनशील अभिव्यक्तीच्या शक्तीचे उदाहरण आहे.

मनोरंजनापेक्षा, हे गीत आपल्या सर्वांना शक्तिशाली आवाहन करते की, आपण आता जागे झाले पाहिजे आणि आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे. आपल्याला जागरूक नागरिकांच्या एका पिढीची आवश्यकता आहे, जी आपल्या पृथ्वीच्या रक्षणाचे महत्त्व समजू शकेल. आम्ही सर्वांनाच हरित भविष्याच्या दिशेने कार्य करण्याचा आग्रह करत आहोत आणि याची सुरुवात स्वतःपासून होते आहे.”