डिस्नी+ हॉटस्‍टार ठरला डॉल्‍बी व्हिजनमध्‍ये लाइव्‍ह स्‍पोर्टसचे स्ट्रिमिंग करणारा पहिला स्ट्रिमिंग प्‍लॅटफॉर्म

डिस्नी+ हॉटस्‍टार भारतातील आणि जगातील क्रिकेटसाठी डॉल्‍बी व्हिजन®मध्‍ये लाइव्‍ह स्‍पोर्टस् स्ट्रिमिंग करणारा पहिला स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म बनला आहे. सुरू असलेल्‍या आयसीसी मेन्‍स टी२० वर्ल्‍ड कप २०२४ मधील भारतीय संघाचे सर्व सामने, सुपर ८, उपांत्‍यफेरीचे सामने आणि अंतिम सामना यांचे लाइव्‍ह स्ट्रिमिंग डिस्नी+ हॉटस्‍टारवर डॉल्‍बी व्हिजनमध्‍ये करण्‍यात येणार आहे.

डिस्नी+ हॉटस्‍टारच्‍या प्रीमियम-ओन्‍ली सबस्‍क्रायबर्सना घरामध्‍ये सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद मिळू शकतो, जेथे ते डॉल्‍बी व्हिजनमध्‍ये आयसीसी मेन्‍स टी२० वर्ल्‍ड कप २०२४ पाहण्‍याचा अनुभव घेऊ शकतात. क्रिकेट चाहते वास्‍तविक रंगसंगती, शार्प कॉन्‍ट्रास्‍ट आणि डॉल्‍बी व्हिजनमध्‍ये खेळाच्‍या प्रत्‍येक रोमहर्षक क्षणांचा अनुभव घेऊ शकतात. 

या टप्‍प्‍याबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत डिस्नी+ हॉटस्‍टारच्‍या इंजीनिअरिंगचे प्रमुख मुकुंद आचार्य म्‍हणाले, ”भारतात क्रिकेट खेळ धर्म मानला जातो आणि क्रिकेटप्रेमींसाठी खेळाचे सर्वोत्तम मनोरंजन देण्‍याचा आमचा सतत प्रयत्‍न आहे. आम्‍हाला आमच्‍या प्रीमियम-ओन्‍ली वापरकर्त्‍यांसाठी त्‍यांच्‍या स्क्रिन्‍सवर आयसीसी मेन्‍स टी२० वर्ल्‍ड कप २०२४ पाहण्‍याचा अभूतपूर्व अनुभव देण्‍याकरिता डॉल्‍बी व्हिजन सादर करण्‍याचा आनंद होत आहे. डॉल्‍बीसोबतचा आमचा सहयोग भारतातील स्‍पोर्टस् स्ट्रिमिंगसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि मनोरंजन व तंत्रज्ञानामधील सर्वोत्तम बाब प्रदान करण्‍यामधील आमच्‍या प्रयत्‍नांतील नवीन प्राधान्‍यक्रम आहे.”

डॉल्‍बी व्हिजनमधील मनोरंजनाला शॉर्पर कॉन्‍ट्रास्‍ट आणि आकर्षक रंगसंगतींसह अधिक आकर्षक करण्‍यात आले आहे, ज्‍यामधून अचंबित करणारे मनोरंजन मिळेल. हे परिवर्तन डिस्नी+ हॉटस्‍टारच्‍या प्रीमियम-ओन्‍ली सबस्क्रिप्‍शनसाठी युनिक सेलिंग प्रपोझिशन (यूएसपी) असेल, जे वापरकर्त्‍यांना अद्वितीय व्‍युइंग अनुभव देईल, ज्‍यामुळे खेळातील प्रत्‍येक क्षण अधिक उत्‍साहित होईल.

आयएमईए डॉल्‍बी लॅबोरेटरीजच्‍या कमर्शियल पार्टनरशीप्‍सचे वरिष्‍ठ संचालक करण ग्रोव्‍हर या सहयोगाबाबत आपला आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ”आम्‍हाला भारतात पहिल्‍यांदाच लाइव्‍ह स्‍पोर्ट स्ट्रिमिंगसाठी डॉल्‍बी व्हिजन सादर करण्‍याकरिता डिस्नी+ हॉटस्‍टारसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. आयसीसी मेन्‍स टी२० वर्ल्‍ड कप २०२४ दरम्‍यान डिस्नी+ हॉटस्‍टार सबस्‍क्रायबर्स डॉल्‍बी व्हिजनमध्‍ये खेळ पाहण्‍याचा अनुभव घेऊ शकतात, ज्‍यामुळे ते खेळामध्‍ये अधिक सामावून जातील. हा सहयोग प्रेक्षकांना क्रिकेट पाहण्‍याच्‍या भावी पद्धतींची ओळख करून देण्‍यामधील मोठे यश आहे.”  

डॉल्‍बी व्हिजन असलेल्‍या फक्‍त निवडक ४के-सक्षम स्‍मार्ट टेलिव्हिजन्‍सवर या सामन्‍यांचे स्ट्रिमिंग पाहता येईल, ज्‍यामुळे प्रेक्षकांना सुसंगत तंत्रज्ञानामधून सर्वोत्तम अनुभवाची खात्री मिळेल. डिस्नी+ हॉटस्‍टार नाविन्‍यता आणत राहिल आणि अपवादात्‍मक मनोरंजन अनुभव देण्‍यामध्‍ये नेतृत्‍व करेल. लाइव्‍ह क्रिकेट स्ट्रिमिंगसाठी डॉल्‍बी व्हिजनच्‍या सादरीकरणामधून ही कटिबद्धता दिसून येते.