या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी; राज-उद्धव अखेर एकत्र; मराठी मोर्चात बंधूभेट; ५ जुलैला दाखवणार ठाकरेंची ताकद

By: Editor_Pratik

On: Friday, June 27, 2025 5:37 AM

Google News
Follow Us

हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या मोर्चांनी महाराष्ट्र दणाणून निघणार आहे. राज ठाकरे पुरस्कृत मोर्चा 5 जुलैला तर 7 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार असणार आहे. ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे एकाच दिवशी काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही यासाठी हालचाली सुरु आहेत. तसेच वेगळा मोर्चा काढण्यासाठी 5 जुलैच्या मोर्च्यात सहभागी व्हावं, यासाठी प्रयत्न केले जात होते. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे.

हेही वाचा BIG NEWS PUNE METRO : मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी

महाराष्ट्रतील शाळात हिंदीसक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे हिंदीसक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं आहे.

हेही वाचा विहिरीच्या काठावर ओढणी; संशय आल्याने ४५ फूट खोल अंडरवॉटर कॅमेरा सोडला अन् पायाखालची जमीन सरकली

महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच काल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईमधील गिरगाव चौपाटी येथे भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने ७जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा ब्रेकिंग ! वीज ग्राहकांना मोठा दिलासा, राज्यभर वीजदर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय

मात्र मराठीच्या मुद्द्यावर दोन वेगवेगळे मोर्चे कशासाठी असा प्रश्न या घोषणांनंतर उपस्थित झाला होता. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज सकाळी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात एकत्रच मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा ट्विटच्या माध्यमातून केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित छायाचित्रासह केलेल्या या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ! जय महाराष्ट्र!असे म्हटले आहे.

गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. तसेच दोन्ही भावांनीही एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले होते. आता मराठी भाषेच्या मुद्द्यावर आणि हिंदी सक्तीविरोधात निघणाऱ्या मोर्चामधून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने या माध्यमातून राज्याच्या राजकारणालाही मोठी कलाटणी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मला तर वाटतं, मराठी माणसाची एकत्र ताकद दिसणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांनी काल आवाहन केलं होतं, त्याला समोरुन प्रतिसाद मिळाला. मराठी भाषेची गळचेपी आणि हिंदी भाषेची सक्ती आणि लादण्याचा प्रयत्न होतोय, त्याविरोधात मराठी माणसाने एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. मराठी भाषा हा राजकीय मुद्दा नाही. मराठी भाषेपुढे कोणीही छोटं-मोठं नाही, सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. यासाठी राज ठाकरे सकारात्मक आहेत, आम्ही सगळे सकारात्मक आहोत. 5 जुलै रोजी हा मोर्चा एकत्रितपणे निघेल, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026