BIG NEWS : भरदिवसा थरार; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या; शहरात खळबळ

By: Editor_Pratik

On: Sunday, June 29, 2025 7:28 AM

police_e83b62
Google News
Follow Us

BIG NEWS : भरदिवसा थरार; सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची निर्घृण हत्या; शहरात खळबळ

अमरावती शहरात भर रस्त्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची खून करून खळबळ उडवणारी घटना घडली आहे. दुचाकीवरून जात असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला चारचाकी वाहनाने उडवून, त्यानंतर छाती व पोटावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. काही तासांतच पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे.

मृत पोलिस अधिकारी अब्दुल कलाम अब्दुल कादर हे वलगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. रविवारी ते दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर कोसळले आणि त्यानंतर हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले.

कर्क राशीत असताना चंद्राने अश्लेषा नक्षत्रात प्रवेश केला; 3 राशींचे नशीब पलटणार, राजयोगाची शक्यता

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जवळच्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या दोन पथकांनी तात्काळ तपास सुरू केला आणि काही तासांतच दोन आरोपींना अटक करण्यात आली. गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्राथमिक तपासानुसार, २० जून रोजी अब्दुल कलाम यांचा भाऊ अब्दुल सलाम याचा काही व्यक्तींशी पैशाच्या वादावरून वाद झाला होता. त्या वादात मध्यस्थी करण्यासाठी अब्दुल कलाम गेले होते. त्याचा राग मनात धरूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपी असल्याची माहिती असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 14, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026