रायन इंटरनॅशनल अकॅडमी आणि गो ग्रीन एनजीओचा धरण संवर्धन उपक्रम

पुणे, जून, २०२४: नैसगिक संसाधनांचे जतन करण्‍याच्‍या उपक्रमांतर्गत रायन इंटरनॅशनल अकॅडमी, हिंजवडीने पुण्‍यातील गो ग्रीन एनजीओसोबत सहयोगाने फेज३, हिंजवडीच्‍या डोंगरामध्‍ये असलेल्‍या रिहेगाव धरणावर धरण संवर्धन उपक्रम हाती घेतला. या समुदाय-केंद्रित उपक्रमाचा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाश्‍वतता व पर्यावरणीय संवर्धनाप्रती जागरूकतेचा प्रसार करण्‍याचा उद्देश होता.

रायन इंटरनॅशनल अकॅडमी हिंजवडी शाखा प्‍लास्टिक रिसायकलिंग, प्‍लोगॅथन इत्‍यादी सारख्‍या सहयोगात्‍मक उपक्रमांच्‍या माध्‍यमातून विद्यार्थ्‍यांमध्‍ये जागरूकतेचा प्रसार करण्‍यात साह्यभूत राहिली आहे.

या उपक्रमामध्‍ये २० स्‍वयंसेवकांसह पालक व शाळेचे शिक्षकवर्ग, तसेच एनजीओच्‍या नि:स्‍वार्थ स्‍वयंसेवकांनी सहभाग घेतला. फावडे-कुदळ हातात घेऊन त्‍यांनी गोण्‍यांमध्‍ये माती भरण्‍यास आणि स्‍थानिक धरणाला आधार देणारी भिंत तयार करण्‍यास मदत केली. या सहयोगात्‍मक प्रयत्‍नाचा पावसाळ्यापूर्वी धरणाची रचना मजबूत करण्‍याचा मनसुबा होता, जे जल संवर्धन आणि स्‍थानिक परिसंस्‍था देखरेखीमध्‍ये महत्त्‍वाची भूमिका बजावते.

सामुदायिक सेवेबाबत मत व्‍यक्‍त करत रायन इंटरनॅशनल अकॅडमीच्‍या मुख्‍याध्‍यापिका श्रीमती सोनिका कोछर गिरोत्रा स्‍वयंसेवकांचे कौतुक करत म्‍हणाल्‍या, ”पर्यावरणाप्रती आमचे विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि पालकांची समर्पितता व उत्‍साह अत्‍यंत प्रशसंनीय आहे. हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाप्रती आमची कटिबद्धता दृढ करण्‍यासोबत आमच्‍या समुदायाला एकत्र आणतो.”

गो ग्रीन एनजीओमधील प्रतिनिधी श्री. नरेश यांनी पर्यावरण संवर्धनामध्‍ये समुदाय सहभागाच्‍या महत्त्वावर भर दिला. ते म्‍हणाले, ”आपण आपल्‍या पर्यावरणाची कशाप्रकारे काळजी व देखरेख घेतो यामधून भावी पिढ्यांसाठी आदर्श स्‍थापित होतो. पर्यावरणामध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍याचा उत्‍साह असलेले प्रबळ समुदाय जागतिक हवामान संकटासाठी प्रमुख सोल्‍यूशन आहे. आम्‍हाला समुदायामध्‍ये शाश्‍वतता व पर्यावरण संवर्धनाबाबत प्रेरित करण्‍यासाठी रायन इंटरनॅशनल अकॅडमीसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे.”