खडकवासला जलाशय रक्षणासाठी हिंदू जनजागृती समितीची रंगपंचमीला जनजागृती मोहीम

By: Editor_Manas

On: Saturday, March 7, 2026 10:09 AM

Google News
Follow Us

पुणे : संपूर्ण पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला जलाशयाचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘हिंदू जनजागृती समिती’तर्फे राबविण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमेला यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. धूलिवंदनाच्या दिवशी एकही नागरिक रंग खेळत जलाशयाच्या पाण्यात उतरला नाही. त्यामुळे ही मोहीम शंभर टक्के यशस्वी ठरल्याचे समितीने सांगितले.

या यशानंतर आता रंगपंचमीच्या निमित्ताने रविवार, ८ मार्च रोजीही जलाशय रक्षणासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे हे २४ वे वर्ष असून सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.३० या वेळेत जलाशय परिसरात ‘हिंदू जनजागृती समिती’, समविचारी संघटना आणि खडकवासला ग्रामस्थ यांच्या वतीने मानवी साखळी उभी करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८९८३३ ३५५१७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 26, 2026

September 24, 2026

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026