टीव्हीएस यंग मीडिया रेसर्स प्रोग्रॅम ८.० सह टीव्हीएस रेसिंगचे पुनरागमन, एमआयसी, चेन्नई येथे निवड फेरी

चेन्नई, मे २०२४ – १९८२ पासून रेसिंग क्षेत्रातील गुणवत्ता जोपासण्यात आघाडीवर असलेले टीव्हीएस रेसिंग मद्रास इंटरनॅशनल सर्किट (एमआयसी) येथे टीव्हीएस यंग मीडिया रेसर प्रोग्रॅमची (वायएमआरपी) आठवी आवृत्ती लाँच केली आहे. या विभागासाठीची निवड फेरी यशस्वीपणे पार पडली असून तरुण पत्रकारांचे प्रतिनिधीत्व करणारे सर्वात वेगवान १६ रेसर्स देशभरातून निवडण्यात आले आहेत. २०१७ पासून या प्रोग्रॅमने रेसिंग क्षेत्रातील गुणवत्ता जोपासण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यातून टीव्हीएस रेसिंगची भारतात मोटरस्पोर्ट्सला चालना देण्याची आणि मीडियातील रेसिंगची आवड असणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देण्याची  बांधिलकी दिसून येते.

या प्रोग्रॅमची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

  •     टीव्हीएस वायएमआरपीद्वारे तरुण रेसर्सना सुरक्षित वातावरणात रेसिंगचा थरार अनुभवता येतो तसेच इंडियन नॅशनल मोटरसायकल चॅम्पियनशीपसह प्रतिष्ठित टीव्हीएस वन मेक चॅम्पियनशीपमध्ये स्पर्धा करण्याची संधी मिळते.
  •     एमआयसी चेन्नई येथील टीव्हीएस वायएमआरपी ८.० च्या निवड फेरीत ३९ सहभागींपैकी १६ रायडर्स या सीझनचे रेसर्स ठरले.
  •     टीव्हीएस रेसिंग ट्रेनिंग अकॅडमी लेवल -१  प्रोग्रॅमध्ये पूर्ण दिवसीय कठोर प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला होता व त्याअंतर्गत प्रशिक्षित टीव्हीएस रेसिंग चॅम्पियन्सची थिअरी तसेच प्रात्यक्षिक शिकवले.
  •     सर्वात वेगवान १६ रेसर्स टीव्हीएस इंडिया वन मेक चॅम्पियनशीप यंग मीडिया प्रोग्रॅमच्या विभागात स्पर्धा करतील. ही स्पर्धा इंडियन नॅशनल मोटरसायकल चॅम्पियनशीपसह होणार आहे.
  •     निवडलेले रेसर्स संपूर्ण सीझनदरम्यान मीडिया विभागात रेस- स्पेशल टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० फोरव्ही चालवताना दिसतील.
  •     इतक्या वर्षांत या प्रोग्रॅमअंतर्गत २०० पेक्षा जास्त पत्रकारांना रेसिंगचे कौशल्य शिकवण्यात आले असून त्यापैकी काही जण आता रेसिंगच्या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये सहभागी होतात.
  •     रेसर्ससाठी सुरक्षेचा मापदंड प्रस्थापित करत टीव्हीएस रेसिंगने भारतात पहिल्यांदाच मोटोजीपी युजर्सद्वारे वापरली जाणारी अल्पाइनस्टार्स एयर बॅग्ज टेक एयर ५ आणि एफआयएम होमोलोगेटेड हेल्मेट्स टीव्हीएस वायएमआरपीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.                        

याप्रसंगी प्रीमियम व्यवसाय विभागाचे प्रमुख श्री. विमन सुंब्ली म्हणाले, ‘टीव्हीएस मोटर कंपनीला (टीव्हीएसएम) चार दशकांचा रेसिंगचा वारसा लाभला असून भारतात मोटरस्पोर्ट्स सहज उपलब्ध करून देण्यात कंपनीने महत्त्वाची कामगिरी केली आहे. कंपनी जगभरात गुणवत्ता जोपासण्यासाठी बांधील आहे. टीव्हीएसएम आघाडीवर राहून तरुण रेसर्सना विकसित करत रेसिंगचे क्षेत्र जास्तीत जास्त सर्वसमावेशक होईल याची काळजी घेत आहे. टीव्हीएस वायएमआरपीतर्फे मीडियातील रेसिंग प्रेमींना खास ट्रेनिंग दिले जात असून हा प्रोग्रॅम मीडियातील बहुप्रतीक्षीत कार्यक्रम ठरला आहे. निवड फेरीदरम्यान सहभागींचा उत्साह आणि मेहनत खऱ्या अर्थाने प्रेरणादायी होती. आम्हाला विश्वास वाटतो, की आगामी प्रशिक्षण सत्रामध्ये त्यांचे कौशल्य आणि कामगिरी आणखी उंचावेल. आम्ही सर्व रायडर्सना आगामी सीझनसाठी शुभेच्छा देतो.’

 टीव्हीएस वायएमआरपी सहभागी उच्च दर्जाचे सुरक्षा गियर्स परिधान करणार असून ते टीव्हीएस रेसिंग आणि अल्पाइनस्टार्स यांच्यात गेल्यावर्षाच्या अखेरीस जाहीर करण्यात आलेल्या भागिदारीअंतर्गत बनवले जाणार आहेत.

हेल्मेट्स

  1. एफआयएम होमोलोगेटेड हेल्मेट्स २२.०६
  2. कार्बन फायबर शेल – बहुस्तरीय कंपोझिट कन्स्ट्रक्शन आणि अत्याधुनिक इपॉक्सी रेझिन यांचा मेळ घालण्यात आला असून त्यामुळे ताकदीत वाढ झाली आहे, तर मेकॅनिकल कामगिरी आणि वजनाचे गुणोत्तर सुधारले आहे.
  3. एयरो डायनॅमिक – एयरोडायनॅमिक कार्यक्षमता आणि स्थैर्यासाठी हेल्मेटचा एकंदर आकार विकसित करण्यात आला आहे, तर रेस स्पॉयलर आणि विंगलेट्स आणखी ४.५४ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.

एयरबॅग्ज्स:

  1. सक्रिय इलेक्ट्रॉनिक यंत्रणा ज्यात सहा इंटिग्रेटेड सेन्सर्सचमा समावेश आहे. (३ गायरोस्कोप्स आणि ३ अक्सेलरोमीटर्स) 
  2. क्रॅश अल्गोरिदम्स जे एआयच्या मदतीने मॉनिटरवर अचूकपणे लक्ष ठेवते आणि अपघात झाल्यास एयरबॅग कधी डिप्लॉय करायच्या हे ठरवते.
  3. एयर- बॅग केवळ ३० मिलिसेकंदांत उघडतात.
  4. कित्येक वर्षांचे संशोधन आणि जगातील आघाडीच्या ५० टक्के मोटोजीपी रेसरच्या मदतीने विकसित

भारतातील आघाडीचा रेसिंग ब्रँड या नात्याने टीव्हीएस रेसिंग १९९४ पासून वन मेक चॅम्पियनशीपचे (ओएमसी) आयोजन करत असून त्याचा चार विभागांत विस्तार करण्यात आला आहे – नवखे, स्त्रियांसाठी, मीडिया आणि तज्ज्ञ. त्याशिवाय टीव्हीएस रेसिंगद्वारे २०२२ मध्ये पहिली टीव्हीएस एशिया वन मेक चॅम्पियनशीप आयोजित करण्यात आली होती. आतापर्यंत ३००० लोकांनी टीव्हीएस ओएमसीच्या विविध विभागांत भाग घेतला आहे.