७ सीटर कार घेण्याचा विचार आहे? तर ‘या’ पाच कार आहेत स्वस्त आणि उत्तम पर्याय

अनेक मोठ्या कार उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या ७ सीटर कार भारतीय बाजारात लॉन्च केल्या आहेत. मात्र, काही गाड्या अशा आहेत ज्या मध्यमवर्गीयांच्या बजेटमध्ये बसत नाहीत. आज जाणून घेऊया काही ७ सीटर कार्सबद्दल ज्या मध्यमवर्गीय लोकांना देखील परवडतील. 

 

 

तुम्ही ७ सीटर कारसाठी ‘Kia Motors’चा विचार करू शकता हे तुम्हाला सात-सीट पर्यायासह ‘Carens MPV’चा पर्याय देखील देते. या कारची किंमत ₹१०.५२ लाख पासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंट ₹१९.२२ लाखांच्या किंमतीवर खरेदी करता येईल.

महिंद्राने बोलेरो निओ ही सात-सीटर ‘SUV’ कार तुम्ही ₹९,९४ लाखांच्या सुरुवातीच्या किंमतित उपलब्ध आहे. 

एर्टिगा मारुतीने सात-सीट पर्यायासह ऑफर केलेली कारमध्ये एक मस्त फीचर्स देखील देण्यात आले आहे. ही कार पेट्रोल सोबत सीएनजी पर्यायासह विक्रीसाठी उपलब्ध आहे. मारुती एर्टिगाची किंमत ₹८.६९ लाख रुपये आहे. या कारचे सीएनजी व्हेरियंटची किंमत ₹१०.७८ लाख रुपये आहे.

रेनॉल्ट ट्रायबर सात-सीट पर्यायासह उपलब्ध आहे हे वाहन देशातील सर्वात स्वस्त सात सीटर कारपैकी एक आहे. या कारची किंमत ₹६ लाख पासून सुरू होते आणि याचे एएमटी व्हेरिएंट ₹८.१२ लाख च्या किंमतीवर खरेदी करता येते. 

तुम्हाला टोयोटा रूमिऑन ₹१०.४४ लाखाच्या सुरुवातीच्या किंमतत खरेदी करता येईल. टोयोटाचे टॉप व्हेरियंटची किंमत ₹१३.७३ लाखांनी सुरू होते. यामध्ये तुम्हाला कंपनी सीएनजीचा पर्यायही देते ज्याची किंमत ₹११.३९ लाख आहे. (फोटो : कारदेखो)