Tata Punch आणि Exter ला आता विसरा! हुंडाई आणतीये सर्वात स्वस्त SUV; किंमत असेल फक्त…

Hyundai आता बाजारपेठेत आपली नवी परडवणारी एसयुव्ही आणण्याच्या तयारीत आहे. हुंडाईने नुकतंच CASPER नावाने ट्रेडमार्क दाखल केला आहे. 

 

रिपोर्टनुसार, कंपनी आता बाजारपेठेत आपली नवी परडवणारी एसयुव्ही आणण्याच्या तयारीत आहे. हुंडाईने नुकतंच CASPER नावाने ट्रेडमार्क दाखल केला आहे.

 

CASPER नेमप्लेटचा ट्रेडमार्क केल्यानंतर तिच्याकडे Santro ची रिप्लेसमेंट म्हणून पाहिलं जात आहे. 2022 मध्ये कंपनीने ही कार बंद केली आहे.

जर CASPER ला बाजारात आणलं तर ती EXTER च्या खालोखाल असेल आणि किंमतही कमी असेल अशी आशा आहे.   

दक्षिण कोरियन मार्केटमध्ये ही कार आधीपासूनच उपलब्ध आहे. पण जर ती भारतीय बाजारपेठेत लाँच झाली तर काही बदल केले जाऊ शकतात.

जागतिक बाजारात असणाऱ्या CASPER ची लांबी 3595 मिमी, रुंदी 1595 मिमी आणि उंची 1575 मिमी आहे. यामध्ये 2400 मिमीचा व्हीलबेस मिळतो. Exter च्या तुलनेत ही छोटी आहे.