‘जिद, चलते रहने की’ या टॅगलाईनसह पॅरॅगॉन ब्रँडची नवी ओळख

पुणे, २४ मे २०२४ : भारताचा अग्रणी पादत्राणे ब्रँड पॅरॅगॉनने आपल्या ब्रँडची पुनः जुळवणी करण्याची घोषणा केली असून तो भारताच्या गाभ्याशी सुसंगत आणि पुन्हा जोडणारा आहे. पादत्राणांच्या बाजारपेठेत या ब्रँडची ५० वर्षे पूर्ण होत असताना हे रूपांतर घडून येत आहे. ‘जिद, चलते रहने की’ या टॅगलाईनसह ब्रँडची नवी ओळख सामान्य व्यक्तीच्या अदम्य चेतनेला सलाम करते. हे रूपांतर आपल्या राष्ट्रातील दैनंदिन नायकांवर प्रकाशझोत टाकते जे प्रत्येक आव्हानाचा टिकाऊपणे सामना करतात आणि आपल्या अथक भावनेतून नवीन भारत साकार कऱणे शक्य करतात.

या पुनः जुळवणीच्या माध्यमातून पॅरॅगॉन आपल्या व्यापक पाठिराख्यांशी असलेले बंध स्थापन करून त्यांना जवळ करत आहे. एक असा भारत आहे जो प्रखर उन्हापासून ते कुडकुडत्या थंडीपर्यंत, दिवस नि रात्र, जे करायचे आहे ते करताना कधीही थांबत नाही. या प्रवासाच्या माध्यमातून हा ब्रँड भारतीय कामगार वर्गाच्या निश्चयाचा सन्मान करतो. हा वर्ग मध्यमवर्गापासून निम्न मध्यमवर्ग तसेच स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींपासून अन्य सर्वांपर्यंत पसरलेला आहे. हे दैनंदिन जीवनातील नायक असून ते नवीन भारत घडवत आहेत.

पॅरॅगॉनचे कार्यकारी उपाध्यक्ष सचिन जोसेफ म्हणाले,  “‘जिद, चलते रहने की’मध्ये पॅरॅगॉनची मध्यवर्ती मूल्ये साकार झाली आहेत. भारतीय लोकांची ओळख असलेली चिवटपणा, साहस आणि न संपणारा आशावाद यांचा तो सन्मान करतो. भारतीयांच्या अविश्वसनीय चेतनेला तो मानवंदना देतो. या गुणांचे प्रकटीकरण करणाऱ्या दैनंदिन नायकांशी या अभियानाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा जोडल्या जात आहोत. आम्ही त्यांच्या पाठीशी राहण्याची, त्यांना आराम व आधार देण्याच्या कटिबद्धतेची हमी देत आहोत. दीर्घकाळापर्यंत आम्ही अधिक समकालीन लोकं आणि परिस्थितीवर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र या ब्रँडशी जनसामान्यांचा असलेला भावनिक बंध लक्षात घेता पुन्हा आपल्या मध्यवर्ती गाभ्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.”