भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अभ्यासक्रमांची घोषणा

पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज(एरंडवणे,पुणे)ने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी  अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. या अभ्यासक्रमांची माहिती  भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. उज्वला बेंडाळे यांनी पत्रकाद्वारे दिली.बी.बी.ए. एल.एल.बी.(५ वर्ष) ,बी.ए. एल. एल.बी.(५ वर्ष), एल.एल.बी(३ वर्ष ), एल.एल.एम.(२ वर्ष), तसेच पीएच.डी.(लॉ)साठी प्रवेश  प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  बी.बी.ए. एल.एल.बी(५ वर्ष),बी.ए .एल. एल. बी.(५ वर्ष) या अभ्यासक्रमांसाठी   प्रवेश परीक्षा  दि.२३  जून रोजी आहे,त्यासाठी १४ जून ही नाव नोंदणीची अंतिम मुदत आहे.  एल एल बी(३वर्ष ) साठी प्रवेश परीक्षा  दि.२३  जून रोजी आहे,नाव नोंदणीची मुदत १२ जून ही आहे.एल.एल.एम.(२ वर्ष) साठी प्रवेश परीक्षा  दि.१४  जुलै  रोजी आहे ६ जुलै ही नाव नोंदणीची अंतिम मुदत आहे.