जेएसडब्ल्यू पेंट्सने व्यवसाय सुरू झाल्यानंतर 5 वर्षांच्या आत पहिला ऑपरेटिंग नफा पोस्ट केला

मुंबई – मे 2024 : जेएसडब्ल्यू पेंट्स ही भारतातील अग्रगण्य पर्यावरण-अनुकूल पेंट्स कंपनी आणि US$ 24 अब्ज जेएसडब्ल्यू समूहाचा भाग आहे. कंपनीने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 3% (अंदाजे रु. 67 कोटी) पेक्षा जास्त EBITDA मार्जिनवर पहिला पूर्ण वर्षाचा ऑपरेटिंग नफा जाहीर केला आहे. यामुळे व्यवसाय सुरू केल्यापासून 5 वर्षांच्या कमी कालावधीत ऑपरेटिंग नफा कमावणारी जेएसडब्ल्यू पेंट्स ही पहिली आणि सर्वात तरुण भारतीय पेंट कंपनी बनली आहे. कंपनीच्या एकूण महसुलाने उद्योग वाढीच्या तुलनेत दहा पट वृद्धीदर नोंदवून लक्ष्यित रु. 2,000 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. डेकोरेटिव्ह पेंट्स आणि इंडस्ट्रिअल कोटिंग्ज या दोन्ही व्यवसायांमध्ये लक्षणीय मागणीमुळे एकूण कमाईच्या प्रमाणात वाढ झाली.

सध्याचा वाढीचा दर लक्षात घेता जेएसडब्ल्यू पेंट्स पुढील दोन वर्षात (म्हणजे FY26 पर्यंत) रु. 5,000 कोटी गाठण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. डेकोरेटिव्ह पेंट्स विभागातील महत्त्वपूर्ण व्यवसाय परिवर्तनाच्या उपक्रमांद्वारे याला समर्थन मिळेल. कंपनीने आपल्या डेकोरेटिव्ह पेंट्स व्यवसायातील परिवर्तन आणि वाढीचे नेतृत्व करण्यासाठी श्री आशिष राय यांची मुख्य व्यवसाय अधिकारी – डेकोरेटिव्ह म्हणून नियुक्ती केली आहे. युनिलिव्हर सारख्या जागतिक संस्थांमध्ये डिस्ट्रिब्युटिव्ह ट्रेड ट्रान्स्फॉर्मेशनचे नेतृत्व करणारे राय यांना दोन दशकांहून अधिक अनुभव आहे. जेएसडब्ल्यू पेंट्स येथे डेकोरेटिव्ह पेंट्स व्यवसायाचे आशिष राय हे नेतृत्व करतील आणि सतत फायदेशीर टॉप लाइन ग्रोथ देतील.

जेएसडब्ल्यू पेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री पार्थ जिंदल यांच्या मते, “जेएसडब्ल्यू पेंट्ससाठी सर्वात कमी कालावधीत नफा कमावणारी सर्वात तरुण पेंट्स कंपनी होणे हे आमच्यासाठी अभिमानाचे असून, आमच्यासाठी ही पाच वर्षे रोमांचक आणि महत्त्वपूर्ण आहेत. आम्ही आता नवीन संधींचा फायदा घेण्याचा निर्धार केला आहे कारण भारतीय ग्राहक राहणीमान आणि पर्यावरणास अनुकूल उत्पादनांकडे वळत आहेत. आम्ही आमच्या उत्पादन आणि विपणन गुंतवणुकीतील वाढीच्या पुढच्या टप्प्याकडे जात असताना, आमच्या सजावटीच्या पेंट्स व्यवसायात बदल घडवून आणण्यासाठी आशिष राय यांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे.”

जेएसडब्लू पेंट्स उद्योगातील सर्वात तरुण, सर्वात वैविध्यपूर्ण आणि डायनॅमिक टीमसोबत 29 वर्षांच्या सरासरी कार्यरत वयासह आपला व्यवसाय उभारण्यासाठी वचनबद्ध आहे. जेएसडब्ल्यूपेंट्सचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ श्री सुंदरसन एएस यांच्या मते, “आम्ही एक तरुण टीम आहोत आणि यापूर्वी कधीही न केलेल्या गोष्टी करण्याची आमची इच्छा आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही जो बदल करू इच्छितो त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामुळे आमची जलद गतीने वृद्धी होत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांच्या दारापर्यंत जागतिक दर्जाची उत्पादने आणि सेवा आणण्याचे आणि त्यांची घरे खरोखर सुंदर बनविण्याचे वचन देतो.”

जेएसडब्ल्यू पेंट्सचे डेकोरेटिव्ह विभागाचे मुख्य व्यवसाय अधिकारी श्री आशिष राय म्हणाले, “मला जेएसडब्ल्यूपेंट्समध्ये एका महत्त्वाच्या टप्प्यावर सहभागी होताना आनंद होत आहे, या टप्प्यावर व्यवसाय वाढीचा वेग वाढवण्यासाठी चांगली तयारी झालेली आहे. भारतीय ग्राहकांना त्यांच्या घरांचा कायापालट करताना जो आनंद वाटतो त्याच्याशी डेकोरेटिव्ह पेंट्स श्रेणी जवळून जोडली गेलेली आहे. आमच्या डेकोरेटिव्ह पेंट्स व्यवसायातील वाढीच्या पुढच्या टप्प्याला डिजिटल प्रगती, ग्राहकांच्या वाढीव आकांक्षा आणि आमच्या ग्राहकांना आनंद देणारी नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक उत्पादने ऑफर करून सामान्यांपेक्षा अधिक करण्याची आमची स्वतःची वचनबद्धता याद्वारे समर्थित आहे.”