ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूल प्रस्‍तुत ‘ॲस्‍ट्रो फेअर – गो कॉस्‍मो’

  •  ऑर्चिड्स तथवडे कॅम्‍पस् येथील ॲस्‍ट्रो फेअरमध्‍ये विद्यार्थ्‍यांना परस्‍परसंवादी क्रियाकलाप व वर्कशॉप्‍समध्‍ये सहभाग घेण्‍याची संधी मिळणार जसे एलियन एन्‍काऊंटर, प्‍लॅनेटरी पाँडर, ग्रॅव्हिटेशनल जिम, कॉमेट क्राफ्टिंग, कॉस्मिक कॉलिडर, व्‍हर्च्‍युअल वोयागर, स्‍टेलर स्‍पेक्‍टॅकल, स्‍टार सीकर आणि स्पिनिंग स्‍पेसशीप वर्कशॉप
  • गो कॉस्‍मो, युअर तिकिट टू स्‍पेस भारताच्‍या अंतराळ शिक्षण व अन्‍वेषणाप्रती दृष्टिकोनाला पाठिंबा देते

पुणे, २०२४ – शिक्षणामधील सर्वोत्तमतेसाठी प्रसिद्ध असलेल्‍या ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलला त्‍यांचा नवीन उपक्रम ॲस्‍ट्रो फेअर – गो कॉस्‍मो लाँचकरण्‍याचा आनंद होत आहे. हा असाधारण तीन-दिवसीय इव्‍हेण्‍ट सर्व वयोगटातील अंतराळ उत्‍साहींचे लक्ष वेधून घेण्‍यास सज्‍ज आहे. पुण्‍यातील ऑर्चिड्स तथवडे कॅम्‍पस येथे २४ मे ते २६ मे पर्यंत आयोजित करण्‍यात आलेला हा सर्वोत्तम अनुभव खगोलशास्‍त्र, विश्‍वविज्ञान आणि भौतिकशास्‍त्र क्षेत्रातील रोमांचक प्रवासाची खात्री देतो. बेंगळुरू, मुंबईमधील गो कॉस्मो इव्‍हेण्‍ट्सच्‍या यशानंतर स्‍कूल चेनने शुक्रवारी आपल्‍या पुणे एडिशनला सुरूवात केली.

ॲस्‍ट्रो फेअर – गो कॉस्‍मो विद्यार्थ्‍यांमध्‍ये आणि प्रौढ व्‍यक्‍तींमध्‍ये अंतराळ संशोधन, विज्ञान व तंत्रज्ञानाप्रती आवड निर्माण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. एलियन एन्‍काऊंटर, प्‍लॅनेटरी पॉंडर, ग्रॅव्हिटेशनल जिम, कॉमेट क्राफ्टिंग, कॉस्मिक कॉलिडर, व्‍हर्च्‍युअल वोयागर, स्‍टेलर स्‍पेक्‍टॅकल, स्‍टार सीकर आणि स्पिनिंग स्‍पेसशीप वर्कशॉप अशा सर्वसमावेशक क्रियाकलापांच्‍या लाइनअपसह सहभागींना कॉसमॉसच्‍या रहस्‍यांचा अभ्‍यास करण्‍यासोबत महत्त्‍वपूर्ण विचारसरणी आणि समस्‍या निवारण कौशल्‍ये वाढवण्‍याची संधी मिळेल.

गो कॉस्‍मो सारख्‍या स्‍पेस एक्‍स्‍प्‍लोरेशन फेअरसाठी एक्‍स्‍पोजरचे महत्त्व सांगत ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलचे अकॅडेमिक्‍स-ॲस्‍ट्रोनॉमीचे उपाध्‍यक्ष अजित सिंग म्‍हणाले, ”गो कॉस्‍मो सारखे ॲस्‍ट्रो फेअर्स अंतराळ अन्‍वेषणाची खात्री देण्‍यासोबत दूरदर्शी विचारवंत आणि नवप्रवर्तकांच्‍या पिढीला घडवत देखील आहेत. भारताच्‍या राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणामध्‍ये अंतराळ शिक्षणाचा समावेश करत आम्‍ही विद्यार्थ्‍यांना उद्योजकता मानसिकतेसह सर्जनशील असण्‍यास प्रेरित करणारे वातावरण निर्माण करत आहोत. हे अत्‍यंत महत्त्‍वपूर्ण आहे, जेथे भारतीय अंतराळ क्षेत्र पुढील दहा वर्षांमध्‍ये ३३ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्‍याची अपेक्षा आहे. ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलमध्‍ये आम्‍ही विद्यार्थ्‍यांना अंतराळ विज्ञानामधील विशेषीकृत प्रशिक्षण देत भविष्‍यासाठी तयार करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. आमचा एसटीईएम शिक्षणावरील फोकस तरूणांना विज्ञान, तंत्रज्ञानमधील भावी प्रमुख बनण्‍यास आणि एक्‍स्‍प्‍लोरेशनमधील मर्यादांना दूर करण्‍यास सक्षम करतो.”

गो कॉस्‍मोबाबत आनंद व्‍यक्‍त करत ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या अकॅडेमिक्‍सच्‍या वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष सुमित्रा गोस्‍वामी म्‍हणाल्‍या, ”गो कॉस्‍मो सर्व वयोगटातील मुलांमध्‍ये विज्ञान व तंत्रज्ञानाप्रती आवड जागृत करण्‍याप्रती आम्‍ही करत असलेल्‍या कामाचे उत्तम उदाहरण आहे. पण आमचा दृष्टिकोन क्‍लासरूमच्‍या चार भिंतींपलीकडे आहे. आमचा भावी पिढीला प्रत्‍यक्ष अनुभव, परस्‍परसंवादी अध्‍ययनासह सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये जिज्ञासू वृत्ती व सर्जनशीलता निर्माण होईल. ही महत्त्वपूर्ण कौशल्‍ये आणि आवश्‍यक मानसिकता विकसित झाल्‍याने ते आपले विश्‍व सामना करत असलेल्‍या आव्‍हानांचा प्रत्‍यक्ष सामना करण्‍यासाठी सक्षम होतील. आम्‍ही तरूणांना नवीन मार्ग खुले करण्‍यास सक्षम करत आहोत.”

ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या तथवडे कॅम्‍पसच्‍या मुख्‍याध्‍यापिका उषा मूर्ती म्‍हणाल्‍या, ”आम्‍ही मुलांमध्‍ये लहानपणापासून अंतराळ विज्ञानाबाबत आवड जागृत करतो, तसेच ५ व ६ वर्षाच्‍या मुलांसाठी ॲस्‍ट्रॉनॉमी (खगोलशास्‍त्र) सत्रांचे आयोजन करतो. मुलांना खेळण्‍यासह शिकण्‍यासाठी आमच्‍या अंतराळ प्रयोगशाळांमध्‍ये सर्वोत्तम प्‍लॅनेटेरियम अनुभव आणि प्रत्‍यक्ष सामील होण्‍याची संधी मिळते. ते मोठ्या वर्गांमध्‍ये गेल्‍यानंतर साधारणत: इयत्ता पाचवीपासून स्‍पेस कॅम्‍प्‍ससह त्‍यांना वास्‍तविक जीवनातील एक्‍स्‍पोजर मिळण्‍यास सुरूवात होते. हे कॅम्‍प्‍स त्‍यांना पूर्णत: नवीन पद्धतीने खगोलशास्‍त्राला एक्‍स्‍लोअर करण्‍याची संधी देतात. आमच्‍याकडे सर्वोत्तम ॲस्‍ट्रोव्‍हर्स क्‍लब ऑन डिस्‍कॉर्ड देखील आहे, जे नियमितपणे मनोरंजनपूर्ण व्हिडिओज व चर्चासत्रांचा आनंद देते. फक्‍त एवढेच नाही आम्‍ही स्‍पर्धा व ऑलिम्पियाड्सच्‍या माध्‍यमातून वर्षभर प्रत्‍यक्ष अध्‍ययन संधी देतो आणि या दोन्‍ही स्‍पर्धा आम्‍ही स्‍वत:हून आयोजित करतो. या मोठ्या ॲस्‍ट्रो फेअर गो कॉस्‍मोमधून तरूण विचारवंतांमध्‍ये युनिव्‍हर्सबाबत जिज्ञासू वृत्ती व अद्भुतेची भावना जागृत करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आमची इच्‍छा आहे की वयाच्‍या सुरूवातीच्‍या काळापासून खगोलशास्‍त्र त्‍यांच्‍या दैनंदिन जीवनाशी किती संबंधित आहे हे जाणून घेण्‍याची त्‍यांच्‍यामध्‍ये उत्‍सुकता निर्माण झाली पाहिजे.”

ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या अकॅडेमिक्‍स-स्‍टुडण्‍ट वेलफेअरचे उपाध्‍यक्ष हर्ष गुप्‍ता म्‍हणाले, ”आम्‍हाला पुण्‍यामध्‍ये ॲस्‍ट्रो फेअर – गो कॉस्‍मो लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. हा पूर्णत: अद्वितीय अनुभव आहे, ज्‍यामध्‍ये अंतराळ शिक्षणाबाबत शिक्षण व मनोरंजन मिळते. वैज्ञानिक विचारवंत, नवप्रवर्तक व एक्‍स्‍प्‍लोरर्सच्‍या नवीन पिढीला प्रेरित करण्‍याचा आमचा मनसुबा आहे. तसेच, आमची मुलांना युनिव्‍हर्सबाबत सखोल माहिती देण्‍याची महत्त्वाकांक्षा आहे. पण त्‍यापेक्षा अधिक म्‍हणजे आमचा एसटीईएम – विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयांप्रती आवड निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे. हे विषय नवीन फ्रण्‍टीयर्स घडवण्‍यासाठी महत्त्वाचे आहेत.”

ॲस्‍ट्रो फेअर राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणामध्‍ये (एनईपी) नमूद केल्‍याप्रमाणे अंतराळ संशोधन व शिक्षणाप्रती भारताच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न आहे. अध्‍ययनामध्‍ये अंतराळ-संबंधित संकल्‍पनांचा समावेश करत ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलचा विद्यार्थ्‍यांना अंतराळ तंत्रज्ञान व संशोधनामधील भावी प्रगतीसाठी आवश्‍यक असलेल्‍या विशेषीकृत कौशल्‍यांसह सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे.