संकष्टी चतुर्थीमुळे थेऊर येथे चिंतामणीच्या दर्शनासाठी गर्दी

By: Editor_Pratik

On: Sunday, May 26, 2024 6:32 PM

Google News
Follow Us

लोणी काळभोर : आज वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी रविवारी आल्याने भाविकांनी श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती.

पहाटे पुजारी आगलावे बंधु यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते. देवस्थान तर्फे मंदिर प्रांगण आणि मंदिराबाहेर मांडव घालण्यात आला होता . दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. उष्णतेमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर परिसरात जागोजागी मोठे कूलर लावण्यात आले होते.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि दर्पण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या प्रमाणात शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे श्रेष्ठ कार्य केले. दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली.

सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने ह.भ. प. माऊली महाराज जाधव कीर्तन केसरी जालना यांचे कीर्तन झाले, चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना निघला त्यांनतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला. जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने देवस्थान तर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात केली. होती. ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थानचे विश्वस्त केशव उमेश विद्वांस लक्ष ठेवून होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti-desai.jpeg

October 16, 2026

October 15, 2026

October 15, 2026

October 15, 2026

October 14, 2026

October 14, 2026