लोनधारकांसाठी खुशखबर :  फोनपेतर्फे विविध श्रेणींमध्ये लोन ऑफरची घोषणा

पुणे ३० मे २०२४:  भारतातील अग्रणीय फिनटेक कंपनी असलेल्या  फोनपे ने आज आपल्या प्लॅटफॉर्मवरून दिल्या जाणाऱ्या लोनमध्ये सहा प्रमुख श्रेणींमध्ये विस्तार केल्याची घोषणा केली आहे – यामध्ये बाईक लोन, कार लोन, होम लोन, गोल्ड लोन, एज्युकेशन लोन आणि म्युच्युअल फंड लोनचा समावेश आहे. यासाठी विश्वासार्ह बँकांच्या नेटवर्कसह भागीदारीत, नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या  आणि फिनटेक्स यांचा समावेश आहे. फोनपे आपल्या५३५ हून अधिक  दशलक्ष नोंदणीकृत युजरच्या अतुलनीय वितरणासह, युजर्सना  सुरक्षित लोन श्रेणीमध्ये एक भक्कम आणि नियमित अनुभव देण्याचे उद्दिष्ट्य ठेवते.

फोनपे ने टाटा कॅपिटल, एल अँड टी  फायनान्स, हिरो फिनकॉर्प, मुथ्थूट फिनकॉर्प, डीएमआय  हाऊसिंग फायनान्स, होम फर्स्ट फायनान्स, रुपे, व्हॉल्ट मनी, ग्रॅडराइट सारख्या काळजीपूर्वक निवडलेल्या  कर्जदात्यांशी  भागीदारी केली आहे आणि येत्या आठवड्यात यात आणखी काही कर्जदाते जोडले जाणार आहेत.

प्लॅटफॉर्मवर सध्या १५ सक्रिय भागीदार आहेत आणि पुढील तिमाहीत २५पर्यंत वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. युजर त्यांच्या फोनपे ॲपवरील सध्याच्या ‘लोन’ विभागांतर्गत कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतात, त्यांना हवी ती लोन श्रेणी निवडू शकतात आणि कर्जदात्यांच्या सूचीमधून ती निवडू शकतात. लोन अर्जाचा प्रवास फोनपे च्या परिचित असलेल्या ॲपद्वारे सुरू केला जातो, एकाधिक ॲप्लिकेशन्स नेव्हिगेट करण्याची गरज दूर करून आणि युजरसाठी ही प्रक्रिया सुलभ केली जाते.

फोनपे लेंडिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत गाला म्हणाले, “आम्ही आघाडीच्या बँका आणि एनबीएफसी  सह सर्व प्रमुख श्रेणींमध्ये आमचा कर्जपुरवठा प्लॅटफॉर्म लॉन्च करत आहोत याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. हे आम्हाला कर्जदाता आणि देशभरातील आमच्या लाखो ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच व्यासपीठावर जोडण्याची संधी देते. कर्जदाते सुरक्षित लोन प्रवासाचे डिजिटायझेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत आणि ग्राहक जलद गतीने डिजिटायझेशनशी जुळवून घेत आहेत.