भारतीय व्यवसायिक ग्राहकांना अजोड वाहतूक सेवा प्रदाता मुव्हीन या यूपीएसच्या ब्रॅन्डचा दुसरा वर्धापनदिन

मुव्हीन, या यूपीएस आणि इंटरग्लोब एन्टरप्रायझेस यांच्या संयुक्त भागीदारीतून निर्माण झालेल्या मुव्हीन या वाहतूक सेवा प्रदात्या ब्रॅन्ड तर्फे भारतातील व्यावसायिकांना वाहतूक सेवा देत असतांनाच दुसरा वर्धापन दिन साजरा केला.  गेल्या दोन वर्षांत कंपनी ने त्यांचे अस्तित्व निर्माण केले असून कंपनी कडे सध्या १५००+ ग्राहक, ३५०० +पिन कोड्स, ४९ शहरे यामध्ये सेवा देण्यात येत असून अजोड वाहतूक सेवे मध्ये एअर एक्सप्रेस आणि ग्राऊंड सेवांचा समावेश आहे.

मुव्हीन च्या सक्षम पायाभूत सुविधां मुळे ही वाढ शक्य झाली आहे.  त्याच्या चेन्नई, हैद्राबाद, अहमदाबाद, कोलकाता, पुणे, मुंबई, बंगलोर आणि दिल्ली एनसीआर मधील एअर ॲन्ड ग्राऊंड हब्ज मुळे वस्तूंची वाहतूक ही सातत्यपूर्ण्, अंदाज करण्यायोग्य आणि प्रतिसादात्मक कार्य करणे शक्य झाले आहेत.  कंपनीच्या मालकीची एकूण २ लाख चौरस फूटांची केंद्रे असून यामुळे मालाची वाहतूक आणि वितरण सहज करणे शक्य झाले आहे.  यामध्ये यूपीएस आणि मुव्हीनच्या पुणे आणि कोलकाता येथील एकत्रित केंद्राचा ही समावेश आहे.  कंपनी च्या संपूर्ण भारतात जवळजवळ ५०० कर्मचारी हे कार्यालये आणि हब्ज मध्ये कार्यरत आहेत.  

शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी मुव्हिन ने २० हून अधिक इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) चा विकास केला असून यामुळे प्रथमच अगदी शेवटच्या टोकापर्यंत डिलिव्हरी करता येते.  ही वाहने दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, हैद्राबाद आणि चेन्नईत असून यामुळे वर्षाला १७ टन कार्बनचे उत्सर्जन कमी होत आहे.  हा उपक्रम म्हणजे कंपनीच्या दीर्घकालीन शाश्वत अशा सेवा ग्राहकांना देऊन त्यांचे ईएसजी लक्ष्य पूर्ण करण्यासाठी टाकलेले एक पाऊल आहे.

“गेल्या दोन वर्षांत मुव्हीनने केलेल्या कामगिरीचा आंम्हाला अभिमान आहे.” असे मुव्हीन एक्सप्रेस चे संचालक जे बी सिंग यांनी सांगितले “  आमच्या ग्राहकांनी दिलेल्या सातत्यपूर्ण सहकार्य आणि भागीदारी बद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.  पुढे जातांना आमचे हे लक्ष्य आहे की हा ब्रॅन्ड भारतातील आघाडीचा एक्सप्रेस लॉजिस्टिक्स ब्रॅन्ड बनावा. आम्ही नेहमीच आमच्या लोकांच्या क्षमता वाढवून त्यांना सक्षम करत आमच्या भागीदारांबरोबर जोडून तंत्रज्ञानातील कुशलता आणण्या मध्ये सातत्याने गुंतवणूक करत राहू.  विभागातील सर्वोत्कृष्ट लॉजिस्टिक्स सेवा देऊन आम्ही सर्व आकाराच्या व्यवसायांना शक्तीशाली करुन त्यांना नवीन उंचीवर नेऊन राष्ट्राच्या वाढीत योगदान देऊ शकू.”

यूपीएस चे भारतातील व्यवस्थापकीय संचालक ग्रेगरी गोबा-ब्ले यांनी सांगितले “ मुव्हीनचा दुसरा वर्धापनदिन साजरा करत असतांना मला खूपच अभिमान वाटतो. आम्ही संपूर्ण भारतातील १५०० हून अधिक ग्राहकांना लॉजिस्टिक्स पार्टनर म्हणून सेवा देत आहोत याचे प्रमुख कारण म्हणजे सक्षम सेटअप आणि कष्टाळू टिम होय.  विविध महत्त्वपूर्ण शहरातील आमच्या हब्ज मुळे मालाची अजोड वाहतूक होऊ शकते. सर्वात महत्त्वाची बाब अशी की वाढीच्या मार्गा बरोबरच आम्ही शाश्वत  विकासही करत आहोत,  या साठी काही महत्त्वाच्या महानगरात इलेक्ट्रिक वाहने देऊन पर्यावरणाशी आमचे नाते वाढवत आहोत.   आम्ही भविष्याकडे मार्गक्रमण करतांना प्रत्येकाच्या योगदाना बद्दल आभार व्यक्त करतो आणि ग्राहकांना सेवा देतांनाच भविष्यात आम्ही आमचे अस्तित्वही भारतात वाढवत राहू.”