बेस्ट रिस्क ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द इयर २०२४ पुरस्काराने स्टार हेल्थ इन्शुरन्स सन्मानित 

पुणे २९ एप्रिल २०२४:  स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड  या भारतातील सर्वांत मोठ्या रिटेल आरोग्यविमा कंपनीने मुंबईत झालेल्या बीएफएसआय इनोव्हेशन कॉन्फेक्स अँड अवॉर्डस् २०२४ या सोहळ्यात, ‘बेस्ट रिस्क ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द इयर २०२४’ पुरस्कार प्राप्त केला. हा पुरस्कार म्हणजे जोखीम व्यवस्थापनाच्या क्षेत्रात स्टार हेल्थ इन्शुरन्सने दाखवलेल्या वचनबद्धतेची पावती आहे. कंपनीमध्ये लवचिक जोखीम व्यवस्थापक संस्कृतीची जोपासना करण्यासाठी केले गेलेले प्रयत्न व नवोन्मेष्कारी उपक्रम यांना मिळालेली ही मान्यता आहे.  

नवोन्मेष आणि ग्राहकाभिमुखता यांवर लक्ष केंद्रित करून स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी उद्योगक्षेत्रात नवीन मापदंड प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असते तसेच आरोग्यविमा परिसंस्थेत सकारात्मक बदलाला चालना देते. कंपनी संघटनात्मक विस्तार, जबाबदारी व शाश्वतता सुलभ करण्याप्रती बांधील आहे. धोरणात्मक जोखीम व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब, सुरक्षिततेला प्राधान्य आणि संघटनात्मक संस्कृतीच्या मूल्यांची जोपासना यांच्या माध्यमातून ही बांधिलकी निभावली जाते. ग्राहकांना व एकंदर समाजाला अधिक चांगल्या भवितव्याच्या दृष्टीने सुरक्षित ठेवण्याच्या उद्दिष्टावर कंपनी ठाम आहे.  

स्टार हेल्थ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रॉय या यशाबद्दल म्हणाले की ,“‘बेस्ट रिस्क ट्रान्सफॉर्मेशन पुरस्कार’ प्राप्त केल्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. आज आरोग्यविमा उद्योग हा जोखमींनी भरलेला आहे. जलदगत्या उत्क्रांत होणाऱ्या बाजारपेठांत जोखमींपासून हवामान बदल, तंत्रज्ञानातील चाकोऱ्या मोडल्या जाणे, भौगोलिक संघर्ष व बदलत्या ग्राहक आयामांपर्यंत अनेक जोखमी आरोग्यविमा व्यवसायात आहेत. आमच्या व्यवसायाच्या महत्त्वाच्या अंगांना पुरेसे संरक्षण मिळेल आणि कोणत्याही आकस्मिकतेला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज राहू याची खात्री करणाऱ्या ठोस जोखीम व्यवस्थापन पद्धतींप्रती आमची बांधिलकी या पुरस्कारामुळे अधोरेखित झाली आहे.”

जोखीम व्यवस्थापन धोरणासाठी प्रबळ जोखीम व्यवस्थापन संस्कृती अत्यावश्यक आहे आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व स्तरांवर कंपनीची क्षमता भक्कम करून ही संस्कृती प्रस्थापित करणे शक्य होते. सर्व कर्मचारी आणि सहयोगी घटकांना जोखीम व्यवस्थापनाच्या मुलभूत तत्त्वांचे प्रशिक्षण देणे तसेच सर्व कर्मचारी स्तरांवर जोखीम हाताळणी नियंत्रणे राबवण्याची क्षमता निर्माण करणे अत्यावश्यक आहे असे स्टार हेल्थला वाटते.