पुणे , ता. २९ : रिव्हॅम्प मोटो या देशातील आघाडीच्या मॉड्यूलर इलेक्ट्रिक टू- व्हीलर उत्पादक कंपनीने नावीन्यपूर्ण, शाश्वत आणि किफायतशीर इलेक्ट्रिक वाहने सादर करून ग्रामीण आणि कृषी गतिशीलता वाढवण्यासाठी नॅकॉफ ऊर्जासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारावर नुकतेच दोन्ही कंपन्यांच्या वतीने स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नॅकॉफ ऊर्जाचे संस्थापक अध्यक्ष राम इकबाल सिंग, व्यवस्थापकीय संचालक पी. सुरेशबाबू, रिव्हॅम्प मोटोचे तीन सह-संस्थापक, प्रितेश महाजन, जयेश टोपे आणि पुष्कराज साळुंके उपस्थित होते. नॅकॉफ ऊर्जा ही कंपनी देशातील रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातील अग्रगण्य डेव्हलपर आणि ऑपरेटर कंपनी असून, ती ऑफ-ग्रिड आणि ग्रिड कनेक्टेड सौरऊर्जा प्रकल्पाचे डिझाइन, कन्सल्टन्सी, इंटिग्रेशन, सप्लाय, इन्स्टॉलेशन, कमिशनिंग आणि मेंटेनन्स या क्षेत्रात कार्यरत आहे.
रिव्हॅम्प मोटो आणि नॅकॉफ ऊर्जा यांच्यातील सहकार्यामुळे नॅकॉफ ऊर्जाच्या संपर्कातील आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यां पर्यंत रिव्हॅम्प च्या ईव्ही पोहोचतील आणि ग्रामीण व कृषी क्षेत्रातील अगदी छोट्या उद्योजकांपर्यंत रिव्हॅम्प मोटोची इलेक्ट्रिक वाहने पोहोचविण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल. रिव्हॅम्प मोटोच्या एम्पॉवरमेंट केंद्रे आणि नॅकॉफची केंद्रे मिळून २०२८ पर्यंत रिव्हॅम्पची किमान ७५ हजार ते एक लाख इलेक्ट्रिक वाहने या क्षेत्रात विकण्याची आणि पाच लाख शेतकऱ्यांना सक्षम करण्याची योजना आहे.
दोन्ही कंपन्यांच्या या महत्त्वपूर्ण सहकार्यावर भाष्य करताना, नॅकॉफचे संस्थापक अध्यक्ष राम इकबाल सिंग म्हणाले, ” नॅकॉफ ऊर्जा देशातील अशा प्रकारच्या पहिल्या एकात्मिक उपायांसारख्या अग्रगण्य उपक्रमांद्वारे अक्षय ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी समर्पित आहे, ज्यात शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक फार्म इक्विपमेंट आणि इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून शेतकऱ्यांना सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे.
रिव्हॅम्प मोटोचे सह-संस्थापक जयेश टोपे म्हणाले, “देशातील सर्वांत प्रभावी आणि उत्तमप्रकारे जोडलेल्या नेटवर्कद्वारे नवी बाजारपेठ आणि मॉड्युलर इलेक्ट्रिक वाहनांसाठी ग्राहकवर्ग जोडण्यासाठी नॅकॉफ ऊर्जाद्वारे भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. छोट्या उद्योजकांना त्यांचा व्यवसाय अखंडपणे आणि कार्यक्षमतेने चालविण्यासाठी मदत करून त्यांची स्वप्ने सत्यात उतरवणारे अग्रगण्य सूत्रधार म्हणून काम करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांसाठी रिव्हॅम्प मोटोची विविध उत्पादने सादर करून, त्यांना आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी रिव्हॅम्प मोटो आणि नॅकॉफ ऊर्जा एक व्यासपीठ प्रदान करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
या ‘मेड-इन-इंडिया’, मॉड्युलर ईव्ही फ्रंट बॉक्स, गुड्स कॅरियर बॉक्स, क्रेट रॅक, साइड रॅक, कूलकीप, पोर्टेबल पॉवरहाऊस, फ्लॅट रॅक आणि कॅरिअर अशा सुविधांसह उपलब्ध करून दिल्या जातील. रिव्हॅम्प मोटो, नॅकॉफ ऊर्जा यांच्यातील करारामुळे नॅकॉफ सदस्यांना रिव्हॅम्प मोटोच्या इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी अगदी सहजपणे करता येईल. शेतकरी आणि ग्रामीण भागातील छोट्या व्यावसायिकांसाठी कर्जे, अनुदान आणि लीज अशी अनुकूल आणि परवडणारी आर्थिक उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही कंपन्या काम करतील.नॅकॉफच्या विविध सहकारी सदस्यांच्या तसेच अनेक संलग्न व्यवसायांच्या वाहतूक आणि लॉजिस्टिक्सच्या गरजा रिव्हॅम्प मोटोच्या इलेक्ट्रिक व्हेइकल्सद्वारे पूर्ण केल्या जातील.