सलमानच्या घराबाहेर गोळीबार; दोघांनी केले ४ राउंड फायर

भिनेता सलमान खानच्या वांद्रा येथील  घराबाहेर गोळीबार झालेला आहे. आज (दि.१४) पाहटे ४.४५ वा.च्या सुमारास बाईकवरून आलेल्या दोघांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात चार राऊंड फायर केल्याची माहीती मिळत आहे.

या घटनेनंतर वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगने सलमान खानला (Salman Khan) अनेक वेळा संपवण्याची धमकी दिली होती. या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. सलमानच्या घराबाहेर पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली असून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.