नाशिक पुणे महामार्गावर भीषण अबघात; एक ठार, 32 जखमी

नाशिक: नाशिक पुणे महामार्गावर गोंदे फाटा येथील पुलावरून महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस (एम एच १४ सीडब्ल्यू ९०७२) खाली कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये एक प्रवासी ठार तर ३२ जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महाकाली ट्रॅव्हल्सची खाजगी आराम बस पुण्याहून नाशिककडे जात असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जखमी रुग्णांना त्वरीत सिन्नर येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर वावी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तथापि हा अपघात बसचे टायर फुटल्यामुळे झाला असावा अशी शक्यता कळविण्यात येत आहे.

दरम्यान अपघातात मृत झालेल्या प्रवाशाचे नाव कश्यप पाठक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जखमी प्रवाशांची नावे..
अब्दुल रज्जाक, सोनाली शेजवळ, मालता शेजवळ, सुंधी सोनी, अशरीध रेड्डी, प्रकाश कौटि,  प्रियंका आलेवर, पवन पांचाळ, शुभम जाधव, भगवान इंगळे, अनिल निकमले, मुकेश सोळंकी, शिवाजी नालेकर, राणी कांची, अमित पांचाळ, निखिल कांडेकोरी, प्रियांशु अलवार, महेश बिडवे, तुषार मिस्त्री, पवन पावरा, राधेश्याम पावरा, रितेश भिल, बशीर  चेतन सूर्यवंशी, सुरेश वाघेला मोहम्मद अली, मेहुल प्रजापती, सोनम पवार, विवेक मिस्त्री यांचा समावेश आहे.

अपघात महिला pudhari.news
अपघातात जखमी झालेली महिला

वावी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देविदास लाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारांसाठी हलविले असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.