पुणे २९ एप्रिल २०२४ : भारतातील आघाडीच्या खासगी विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सने आज प्राइव्ह अनावरणाची घोषणा केली, जो उन्नत आणि अतुलनीय ग्राहक सेवा उत्कृष्टतेच्या दालनांत प्रवेश सुकर करणारा एक विशेष ग्राहक अनुभव कार्यक्रम आहे. पारंपारिकपणे, गेल्या काही वर्षांमध्ये भारतात विम्याचा प्रसार वाढविण्याचा हा एक प्रयत्न असून, मुख्यत्वे मध्यम, उच्च मध्यमवर्ग आणि ग्रामीण ग्राहकांना सामावून घेणारा, श्रेणी २/ श्रेणी ३ शहरे आणि ग्रामीण बाजारपेठेतील ग्राहक पाया विस्तारण्यावर केंद्रित कार्यक्रम आहे. बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स, वरील सर्व ग्राहक विभागांमध्ये विमा संरक्षणाच्या चालनेला भर देण्याबरोबरच, आता विशेषत: वर्धित संरक्षण मर्यादेसह विमा उपायांची नितांत आवश्यकता असलेल्या ग्राहकांच्या विशेष विभागाची देखील पूर्तता करेल. अशा विवेकी ग्राहकांच्या आर्थिक आणि जीवनशैलीच्या प्राधान्यांशी जुळणाऱ्या बहुआयामी आवश्यकता आणि व्यापक संरक्षण ओळखून, प्राइव्ह पारंपारिक विमा प्रस्तावांच्या पलीकडे जाणारा पर्याय ठरतो. प्राइव्हचा भाग बनून, ग्राहक त्यांच्या गरजा अचूकपणे पूर्ण झाल्याची खात्री करून अनन्य आणि प्राधान्यीकृत विमा सेवांच्या श्रेणीमध्ये प्रवेश मिळवू शकतील.
प्राइव्हचा भाग बनण्यासाठी, ग्राहकांना आरोग्य, घर, मोटर, वैयक्तिक अपघात आणि सायबर धोके, त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार विमा या सर्वांमध्ये सुयोग्य विमा योजना निवडण्याची लवचिकता आहे. विमा योजनांमध्ये सध्या माय हेल्थ केअर प्लॅनचा समावेश आहे, ज्यामध्ये पात्रता निकष म्हणून किमान विमा कवचाची रक्कम १ कोटी रुपये आहे; ग्लोबल हेल्थ केअर अंतर्गत परदेशी वैद्यकीय उपचार, आणि आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत नियोजित आणि आपत्कालीन उपचारांसारखे संरक्षण दिले जाते आणि ग्राहकांना पात्रतेसाठी विमा कवचाच्या रकमेपैकी कोणताही पर्याय निवडता येऊ शकेल. याव्यतिरिक्त, व्ही-पे ॲड-ऑन कव्हरसह मोटर विमा योजनेचे संरक्षण दिले जाईल. हे अतिरिक्त (एड-ऑन) संरक्षण वेगवेगळ्या मोटर विम्याच्या विविध वर्धित (एड-ऑन) फायदे एकत्रित रूपात एका योजनेअंतर्गत प्रदान करते, ज्यासाठी मोटार वाहनासाठी किमान विमा घोषित मूल्य (इन्शुअर्ड डिक्लेअर्ड व्हॅल्यू – आयडीव्ही) २५ लाख रुपये किंवा अधिक आवश्यक आहे. माय होम इन्शुरन्स ऑल रिस्क पॉलिसी ही घराची रचना आणि घरातील मौल्यवान सामग्री या दोन्हीसाठी सर्वसमावेशक विमा संरक्षण सुनिश्चित करते. येथे पात्रता निकष हा रचनेसाठी किमान विमा रक्कम ३ कोटी रुपये, उचलता, हलवता न येणाऱ्या सामग्रीसाठी ३० लाख रुपये आणि हलवल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी ६ लाख रुपये असेल. शिवाय, वरील योजनांच्या संयोगाने, ग्राहक ग्लोबल पर्सनल गार्ड पॉलिसी सारख्या प्रगत योजनांसाठी विम्याच्या उच्च श्रेणीची देखील निवड करू शकतात जे अतिरिक्त वर्धित फायद्यांच्या श्रेणीसह जगभरात वैयक्तिक अपघात संरक्षण आणि सतत विकसित होत असलेल्या डिजिटल चलनवलनामुळे संभवणाऱ्या सायबर हल्ल्यांमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी सायबर केअर प्लॅन प्रदान करते.
दाव्यांची प्रक्रिया आणि जलद सहाय्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या तज्ज्ञांद्वारे सेवेचा अनुभव वाढवण्यासाठी प्राइव्ह कटिबद्ध आहे. अशा ग्राहकांना ‘प्राइव्ह कनेक्ट’मध्ये देखील प्रवेश असेल, हा एक समर्पित संघ आहे जो कोणत्याही सेवा विनंती किंवा दाव्यांची पूर्तता करण्यासाठी सर्व विमाविषयक प्रश्न आणि आवश्यकता त्वरीत पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असेल. आरोग्य विम्याच्या दाव्याच्या संदर्भातत, विनासायास रुग्णालयांतून डिस्चार्ज, बरोबरीने व्यावसायिकांकडून घरपोच पॉलिसीपूर्व आरोग्य-तपासणी यासारख्या अतिरिक्त सेवा देखील प्रदान केल्या जातात. शिवाय, ही सेवा ‘केअर एंजल्स’ द्वारे पूरक आहे, जे प्रशिक्षित व्यावसायिक आहेत जे रुग्णालयात भरती होण्याच्या संपूर्ण प्रवासात वैयक्तिक सहाय्य आणि मदत देतात. मोटार विमा एड-ऑन उत्पादन व्ही-पेसाठी, प्राधान्य तत्वावर सर्वेक्षकांच्या तैनातीसह जलद प्रतिसाद देण्यासाठी दावा प्रक्रिया सुव्यवस्थित केली गेली आहे. नॉन-मोटार विमा दाव्यांसाठी, जसे की घराच्या विम्याचा दाव्याचे प्रकरणही अशाच प्रकारे कार्यक्षमतेने हाताळले जाईल, क्लेम हँडलर ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा व त्याने आवश्यक पूर्तता करण्याचा कालावधी हा आजच्या घडीला बाजारपेठेतील सर्वोत्कृष्ट आहे. प्राइव्ह एक असीम दावा प्रक्रियेचा अनुभव देते जे विमा प्रवासाचे संपूर्ण जीवनचक्र वाढवतेच, ग्राहक सेवेतील उत्कृष्टतेत एक नवीन मानदंड देखील स्थापित करते.
प्रिवे, हा पहिलाच प्रकारचा अनोखा कार्यक्रम पुण्यात सुरू करण्यात आला. श्री संजीव बजाज, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, बजाज फिनसर्व्ह लिमिटेड, हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. लाँच इव्हेंटमध्ये, प्रसिद्ध भारतीय संगीतकार जोडी विशाल शेखर यांनी संगीतमय सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. फॅशन डिझायनर रॉकी एसनेही त्याचे अनोखे कलेक्शन दाखवून कार्यक्रमाला ग्लॅमर जोडले. काही सलेक्ट भागीदार आणि कर्मचाऱ्यांनी देखील रॅम्पवर सहभाग घेतला. याशिवाय, या कार्यक्रमात प्रिवे लोगोचे अनावरण श्री संजीव बजाज, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, बजाज फिनसर्व्ह लिमिटेड, श्री तपन सिंघल, एमडी आणि सीईओ, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स, रॉकी स्टार, भारतीय फॅशन डिझायनर आणि श्री. विक्रम भयाना, प्रमुख – मार्केटिंग, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स यांच्या हस्ते झाले.
प्राइव्हच्या अनावरणाप्रसंगी बोलताना, बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. तपन सिंघेल म्हणाले, “देशातील प्रत्येक व्यक्तीच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या विमा उपायांसाठी आम्ही समर्पित आहोत आणि हीच बाब आमच्या केंद्रस्थानी आहे. प्राइव्हच्या अनावरणासह, आम्ही निरंतर नाविन्यपूर्णता आणि विवेकी व्यक्तींच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेलाच अधोरेखित केले आहे. आम्ही ग्राहकांचे अत्याधुनिक मालमत्ता पोर्टफोलिओ, चोख आर्थिक नियोजन आणि त्यांची विशिष्ट जीवनशैली पाहता पारंपरिक नियमांच्या पलीकडे जाणाऱ्या विमा योजनांबाबत त्यांच्या गरजांना आम्ही पुरेपूर ध्यानात घेतो. प्राइव्ह हे अशाच अनन्य ग्राहकांच्या विवेकी प्राधान्यांनुसार बनवलेल्या सर्वोत्कृष्ट श्रेणीतील उत्पादने आणि सेवांसह अनोखेपण जपणारे आहे, अतुलनीय सोयीसाठी ते त्यांना बोटाने एक कळ दाबण्याच्या अंतरावर उपलब्ध आहे.