पुणे २९ एप्रिल २०२४: भारतातील अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल अॅण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी २,३२० कोटी रुपयांचा वार्षिक करोत्तर नफा (पॅट) नोंदविला आहे. हा कंपनीचा सर्वकालीन उच्चत्तम करोत्तर नफा असून त्यात वार्षिक ४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीसाठी वार्षिक ११ टक्क्यांनी वाढ नोंदवित ५५४ कोटी रुपयांचा करोत्तर नफा नोंदविला आहे.
३१ मार्च २०२३ अखेरच्या रिटेल कर्जवितरणाच्या तुलनेत कंपनीचे २०२४ पर्यंत एकूण रिटेल कर्जवितरण ८०,०३७ कोटी रुपयांवर झेपावले असून त्यात वार्षिक ३१ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचे निव्वळ वार्षिक किरकोळ कर्ज वितरण ५४,२६७ कोटी रुपये असून त्यात २९ टक्के वाढ झालेली आहे. कंपनीने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत १५,०४४ कोटी रुपयांचे सर्वकालीन उच्च तिमाही किरकोळ कर्ज वितरण नोंदविले असून त्यात वार्षिक ३३ टक्के तर तिमाही-दर-तिमाही ४ टक्क्याने वाढ झाली आहे.
संचालक मंडळाच्या २७ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या बैठकीत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी प्रति समभाग २.५० रुपये (प्रति समभाग दर्शनी मूल्य १० रुपये) अंतिम लाभांशाची शिफारस करण्यात आली आहे. कंपनीने आतापर्यंत जाहीर केलेला हा सर्वाधिक लाभांश ठरला आहे. आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) सभासदांची मंजूरी प्राप्त झाल्यानंतर लाभांश वितरण वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत भागधारकांना केले जाणार आहे.
दरम्यान, एक शक्तिशाली डिजिटल चॅनल म्हणून उदयास आलेल्या कंपनीच्या प्लॅनेट या ग्राहकाभिमुख ॲपने आत्तापर्यंत १० लाखांहून अधिक डाउनलोड्सचा टप्पा ओलांडल्या आहे, त्यात ग्रामीण भागातून ११ लाखांहून अधिक डाउनलोड्सचा समावेश आहे. आजपर्यंत प्लॅनेट अॅपने ग्राहकांनी विचारलेल्या २१६ लाखांपेक्षा अधिक विनंती, चौकशींबाबत माहितीची पुर्तता करताना १,३०० कोटी रपयांपेक्षा अधिक कर्ज रक्कमेचे संकलन केलेले आहे. तसेच ५,७०० कोटी (वेबसह) रुपयांपेक्षा अधिक रकमेचा कर्जरुपी व्यवसाय मिळविला आहे. कंपनीने सुधारित ग्राहक पोर्टल आणि प्लॅनेट ॲपच्या सुधारित आवृत्तीवर काम करण्यास प्रारंभ केला आहे.
कंपनीच्या चमकदार आर्थिक निकालांवर भाष्य करताना एल अँड टी फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. सुदिप्ता रॉय म्हणाले, “आमच्या लक्ष्य २०२६ या धोरणात्मक योजनेच्या दुसऱ्या वर्षातच ९४ टक्के रिटेलायझेशनची नोंद करण्यात आम्हाला आनंद होत असून आम्ही निश्चित केलेल्या कालावधीच्या आधीच उद्दीष्ट गाठले आहे. आमच्या एकूण रिटेल कर्जात वार्षिक ३१ टक्के वाढ तर वितरणामध्ये २९ टक्के वार्षिक वाढ झाल्याने वित्तीय वर्ष २०२४ साठी आमच्या निव्वळ नफ्यात वार्षिक ४३ टक्क्यांनी वाढ होऊन तो २,३२० कोटी रुपयांवर झेपावला आहे. कंपनीने तिच्या आजपर्यंतच्या इतिहासात साध्य केलेला हा सर्वोच्च वार्षिक करोत्तर नफा ठरला आहे. व्याजदराच्या पातळीवर आव्हानात्मक वातावरण असूनही कर्जासाठी निधी उभारण्याचा आमचा खर्च स्थिर राहिला. तसेच आमच्या कर्जाच्या पोर्टफोलिओ चौकटीतील विविध घटकांत सातत्याने सुधारणेचा प्रवास सुरू आहे. आगामी काळासाठी कर्जाच्या वितरणात २५ टक्क्यांपेक्षा अधिक भरभक्कम वाढ राखत एकूण रिटेलायझेशनमध्ये ९५ टक्क्यांपेक्षा अधिक उद्दीष्ट साध्य करण्यावर आमचे लक्ष केंद्रीत राहणार आहे. कामकाजातील उत्कृष्टता, ग्राहक केंद्रित धोरण, सक्षम कारभार आणि जोखीम व्यवस्थापन तसेच डिजिटल फर्स्ट धोरणाबाबत आमची वचनबद्धता मूल्य निर्मिती आणि ग्राहक-केंद्रित तंत्रज्ञानावर आधारित वित्तीय सेवेतील शक्तिशाली कंपनी उदयास आणण्याच्या दिशेने आमच्या वाढीची गती टिकवून ठेवेल.”