पुणे: पीपलफाय कंपनीच्या वतीने सीएसआर उपक्रमांतर्गत पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या दळवी हॉस्पिटलला रुग्णवाहिका भेट देण्यात आली. आठ लाख रुपयांच्या देणगीतून अत्याधुनिक आरोग्यसुविधांनी सुसज्ज अशी ही रुग्णवाहिका नुकतीच दळवी हॉस्पिटलकडे सुपूर्द करण्यात आली.
सासवड रस्त्यावरील दळवी हॉस्पिटल आसपासच्या भागात आरोग्यसुविधा देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. परंतु, या भागातील गोरगरीब रुग्णांना वेळ व पुरेशा वाहतूक सांध्यांच्या अभावी वैद्यकीय सेवा मिळण्यात विलंब होत होता. या रुग्णवाहिकेमुळे गरजूंना वेळेत उपचार मिळणे शक्य होणार आहे. परिणामी, वैद्यकीय सेवा सुलभ होईल आणि रुग्णांचे जीव वाचतील.
‘पीपलफाय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व राउंड टेबल इंडियाचे सदस्य राजेश भारतीय म्हणाले, “मानवतेसाठी कार्यरत पीपलफायच्या सामाजिक सेवा विभागाने पुन्हा एकदा समाजात बदल घडविण्याचे उदाहरण घालून दिले आहे. दळवी हॉस्पिटल रुग्णवाहिका भेट करत समाजाप्रती असलेली करुणा व कटिबद्धता दाखवून दिली आहे. या उपक्रमामुळे आरोग्यसेवा सुधारण्यावर व समाजातील रुग्णांचे जीव वाचवण्यावर प्रभाव पडेल.”