सोनी मराठी वाहिनीवर पहिल्यांदाच होणार रंगपंचमी महासंगम!

By: Editor_Manas

On: Wednesday, March 20, 2024 12:00 PM

Google News
Follow Us

सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते. नवीन मालिका, नवे  महाएपिसोड, मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणारे सण हे सगळं सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आता लवकरच होळी आणि रंगपंचमी येणार आहेत. त्याची सर्वत्र धूम आहेच, पण होळी आणि रंगपंचमी यांचे निमित्त साधून सोनी मराठीदेखील प्रेक्षकांसाठी विशेष असं काही घेऊन येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर रंगपंचमी महासंगम पहिल्यांदाच होणार आहे. महासंगम म्हणजेच सोनी मराठीवरील सगळ्यांच मालिकांतील प्रेक्षकांना आवडणार्‍या व्यक्तिरेखा आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत. सोनी मराठीवर पहिल्यांदाच एवढा मोठा महासंगम पाहायला मिळणार आहे. नेहमी निरनिराळ्या मालिकांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार्‍या, प्रेक्षकांना आवडणार्‍या ह्या व्यक्तिरेखा रंगपंचमीसाठी एकत्र येऊन किती मजा करताहेत, हे आपल्याला येत्या सोमवारी म्हणजेच २५ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेतील सराफ परिवाराने सोनी मराठीवरील या सगळ्या व्यक्तिरेखांना आपल्या घरी होळी पार्टीनिमित्त एकत्र बोलावले आहे. यामिनी सराफ यांनी या सगळ्याचं आयोजन केलं असून राजवीर आणि मयूरी हे या सगळ्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणार आहेत. या पार्टीमध्ये ‘वीरू आणि प्राजक्ता’, ‘मीरा आणि मल्हार’, ‘बयो आणि डॉ. विशाल’, ‘यशोधन आणि असीम’ हे सगळे कलाकार एकत्र दिसणार आहेत. या रंगपंचमी पार्टीमधील प्रमुख बाब म्हणजे या कलाकारांचे पेहेराव. सगळ्या जोड्या वेगवेगळ्या रंगांचं प्रतिनिधित्व करणार आहेत. रंगपंचमी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर निरनिराळे रंग दिसतात. तशाच निरनिराळ्या रांगांमध्ये हे कलाकार आपल्याला दिसतील. शिवाय या महासंगममध्ये या प्रत्येक कलाकाराचे विशेष असे नृत्य सादरीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. होळी विशेष आणि प्रेक्षकांना आवडणार्‍या निरनिराळ्या गाण्यांवर हे कलाकार  थिरकताना दिसणार आहेत. आजवर कधी झालं नाही ते आता या रंगपंचमी महासंगममध्ये पाहायला मिळणार आहे. सगळे कलाकार एकत्र थिरकतानाही आपल्याला दिसतील आणि हे सगळे एकत्र आल्यावर प्रेक्षकांना धमाल तर नक्कीच येणार. सगळे कलाकार आपल्या नेहमीच्या पेहरावात न दिसता विशिष्ट पेहरावात दिसणार आहेत.

एवढ्या सगळ्यांच्या येण्याने मयूरी आणि राजवीर यांच्यामध्ये जवळीक निर्माण होणार का? मयूरी आपले राजवीरवरील प्रेम व्यक्त करेल का, हे पाहणंही महत्त्वाचं असेल. त्याशिवाय मयूरी बॉडीगार्डच्या वेशात पार्टीमध्ये राजवीरसोबत असणार असेल, तर ती या सगळ्यांचं आदरातिथ्य करायला मयूरीच्या वेशात कशी येणार, हे पाहणं फार उत्सुकतेचं असेल. मयूरी हीच बॉडीगार्ड आहे का? त्याशिवाय यामिनी आणि जोजो मिळून मयूरीला त्रास देण्यासाठी काही विशिष्ट प्लॅन करतील का? हे सगळं आपल्याला रंगपंचमी महासंगममध्ये पाहायला मिळणार आहेत. तर तुम्हीपण नक्की या  ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेतल्या सराफांच्या घरातल्या या होळी पार्टीला. रंगपंचमी महासंगम सोमवारी म्हणजेच २५ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

रंगपंचमी महासंगम २५ मार्च रोजी संध्याकाळी  वासोनी मराठी वाहिनीवर.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

LPG Gas Shorage

March 14, 2026

March 14, 2026

March 14, 2026

March 14, 2026

March 14, 2026

March 14, 2026