बाळापूरमध्ये जाणवला भूकंपाचा सौम्य धक्का; २.९ रिश्टर स्केलवर झाली नोंद

शेगाव (बुलढाणा) : संत नगरी म्हणून राज्यात व बाहेर प्रसिद्ध असलेल्या शेगाव शहरातील अनेक भागात २६ मार्च रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजे दरम्यान भूकंपाचा अतिशय सौम्य असा धक्का नागरिकांना जाणवला.यामुळे काही वेळ अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण ही निर्माण झाले . तर काहींना धक्का जाणवला ते समजलेच नाही.

शेगावात 2.9 रिश्टर स्केलवर झाली नोंद झाली असून यास तहसीलदार डी आर बाजड यांनीही दुजोरा दिला आहे. शेगावात या सौम्य धक्क्यांची २.९ रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे आवाहन तहसीलदार यांनी लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून केले.

शेगाव शहरा सोबतच नजीक असलेल्या बाळापूर मध्ये ही सौम्य धक्का जाणवल्याची माहिती समोर येत आहे. वाढते तापमान आणि भूगर्भातील होणारे बदल पाहता असे धक्के बसत असावे असा तर्क काही जाणकारांनी काढला आहे.