20 वर्षांचा समीर रिझवीने करिअरच्या पहिल्याच बॉलवर राशिद खानला ठोकला षटकार, अन् जिंकले MS धोनीचे मन

Who is Sameer Rizvi CSK vs GT IPL 2024 : एकीकडे जगातील सर्वात एक नंबर टी-20 गोलंदाज राशिद खान आणि दुसरीकडे आयपीएलमध्ये एकही चेंडू न खेळलेला 20 वर्षीय फलंदाज समीर रिझवी. जो इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील 19व्या षटकात फलंदाजीला आला.

समीर रिझवीची ही डेब्यू इनिंग होती. ज्यामध्ये जगातील सर्वोत्कृष्ट टी-20 फिरकी गोलंदाज राशिद खान पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. आणि सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

या सामन्यात समीर रिझवीलाही प्लेइंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली, ज्याने आयपीएल पदार्पण आणि कारकीर्दीतील पहिल्याच चेंडूवर रशीद खानला षटकार ठोकला. राशिद खानने त्याच्या पायाकडे गुगली बॉल टाकला. पण तो गुडघ्यावर बसला आणि षटकार ठोकला.

त्यानंतर समीर रिझवी इथेच थांबला नाही. रशीदच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याने लाँग ऑफवर षटकार मारला. या सामन्यात रिझवीने केवळ 14 धावा केल्या, मात्र ज्या पद्धतीने त्याने राशिद खानवर हल्ला चढवला ते पाहून चेन्नई स्टेडियममध्ये बसलेले चाहतेच नाही तर धोनीलाही आश्चर्याचा धक्का बसला. धोनीनेही रिझवीसाठी टाळ्या वाजवल्या.

कोण आहे समीर रिझवी?

समीर रिझवीला आयपीएल 2024 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने 8.40 कोटी रुपयांना विकत घेतले होते. समीर रिझवी हा यूपीचा खेळाडू असून तो मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो.

गेल्या वर्षी झालेल्या UP टी-20 लीगमध्ये रिझवीने सर्वाधिक षटकार मारले होते आणि CSK ला ही गोष्ट आवडली होती. रिझवीला चेन्नईच्या मॅच फिनिशरची भूमिका देण्यात आली आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या इनिंगमध्येच दाखवून दिले की हा खेळाडूही त्यात सक्षम आहे. रिझवीसाठी ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात त्याला या स्पर्धेत आणखी संधी मिळतील आणि हा 20 वर्षांचा खेळाडू आपली प्रतिभा दाखवेल अशी अपेक्षा आहे.