Shivsena Leader Firing : मोठी बातमी! पुणे युवासेना जिल्हाप्रमुखाच्या कारवर गोळीबार; मध्यरात्री ‘असा’ घडला थरार

By: Editor_Pratik

On: Tuesday, May 20, 2025 6:59 AM

Shivsena Leader Firing
Google News
Follow Us

Shivsena Leader Firing : पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर गोळीबार झाला आहे. सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. वारजे माळवाडी इथं हा प्रकार घडला.

BIG NEWS : कोरोनाचा नवा विषाणू किती खतरनाक? भारतात पुन्हा कोव्हिडची लाट येणार? आरोग्य तज्ज्ञांचं मोठं भाकीत

निलेश राजेंद्र घारे हे आपल्या घरी निघाले होते. दरम्यान, ते वारजे माळवाडी इथल्या गणपती माथा येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात आले यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील होते. कार पार्क केल्यानंतर त्यांच्या कारच्या मागच्या दरवाजाच्या काचेवर दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर तात्काळ फरार झाले. वारजे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

BIG NEWS : राज्यातील मोठा राजकीय भूकंप? सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर जयंत पाटील व रोहित पवार राज्यात मंत्री होणार?

निलेश घारे हे शिंदेंच्या शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख आहेत. या हल्ल्यामध्ये त्यांना कुठल्याही स्वरुपाची हानी झालेली नाही, ते सुखरुप आहेत अशी माहिती सुत्रांकडून कळते.

Shaniwar Wada Horror Story : “काका मला वाचवा” या आवाजामागील खरी कहाणी काय आहे?

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

OPPO India

April 27, 2026

OPPO India

April 27, 2026

April 27, 2026

April 27, 2026

Sbi एसबीआय

April 25, 2026

April 24, 2026