Video : चालता चालता जागीच गेला जीव, तरुणाचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल, लोक म्हणताहेत, असं मरण नको रे बाबा!
आयुष्य हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं म्हणतात. कारण आयुष्यात कधी काय घडेल सांगता येत नाहीत. अगदी बघता बघता काही सेकंदात एखाद्या मृत्यू सुद्धा होऊ शकतो. आता हेच प्रकरण पाहा ना, एक व्यक्ती व्यवस्थित इमारतीच्या परिसरात चालत होता. पण चालता चालता तो अचानक खाली कोसळला. आणि जागीच बिचाऱ्याचा मृत्यू झाला. हा व्हिडीओ पाहून लोकं हळहळ व्यक्त करत आहेत. म्हणताहेत, शत्रूला सुद्धा असा मृत्यू कधी येऊ नये.
Pratik Gangane : प्रतिक गंगणे यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव’ पुरस्कार जाहीर
मीडिया रिपोर्टनुसार ही घटना इंदौरमध्ये घडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही लाल रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती पाहू शकता. हा व्यक्ती व्यवस्थित चालत होता. पण अचानक तो पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीचं वय ३२ वर्ष होतं असं म्हटलं जातेय. त्याला हृदय विकाराचा झटका आला होता. आसपासच्या लोकांनी त्याला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात भरती सुद्धा केलं होतं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. कारण खाली पडताच त्याची प्राणज्योत मालवली होती.
ऐकावं ते नवलंच, चक्क पीएसआय निघाला चोर, बसस्थानकात टोळीच्या माध्यमातून करायचा चोऱ्या
एक और चलते-फिरते अचानक मौत LIVE
मध्य प्रदेश के इंदौर में देखें कैसे हार्ट अटैक से एक और मौत हो गई । न जानें कितनी मौत हुई है पिछले कुछ सालों में लेकिन किसी के लिए अभी भी गंभीर मुद्दा नहीं है । कब चेतेंगे? pic.twitter.com/tqyTIbb5a8
— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) April 17, 2025
हृदयविकाराचा झटका काय येतो? तर हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्या ब्लॉक झाल्या तर हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे हार्ट अटॅक येतो. म्हणून आरोग्य तज्ज्ञ योग्य आहार आणि धुम्रपानासारख्या वाईट सवयींपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. असो, पण या व्हिडीओवर नेटकरी प्रतिक्रिया देताना दु:ख व्यक्त करत आहेत. म्हणताहेत, न कल का पता न पल का पता, तू सोच रहा है वर्षों की. असो, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात कुठले विचार आले? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.