Pratik Gangane : प्रतिक गंगणे यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव’ पुरस्कार जाहीर

By: Editor_Pratik

On: Thursday, April 17, 2025 5:18 PM

Pratik Gangane - sonali kulkarni
Google News
Follow Us

Pratik Gangane : प्रतिक गंगणे यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव’ पुरस्कार जाहीर

KPM मीडिया तर्फे कार्यक्रमाचे आयोजन

सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होणार उद्योजकांचा सन्मान

प्रतिक गंगणे यांच्या पत्रकारीतेतील योगदानाचे होणार कौतुक

पुणे : पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दै. ‘आरंभ पर्व’चे उपसंपादक मा. प्रतिक गंगणे यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. २० एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील हिंजवडी येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. पत्रकारितेतील योगदानाबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रतिक गंगणे यांना प्रदान केला जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय दिपक (भाऊ) मानकर (मा. उपमहापौर, पुणे) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन, सकारात्मक घडामोडींना वाचा फोडणे आणि लोकशाहीला मजबुती देणारे कार्य प्रतिक गंगणे गेल्या काही वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

एएनआय, बिझनेस स्टॅंडर्ड, लोकमत टाइम्स, दै. आरंभ पर्व, प्रिंट, रेड कार्पेट हे या पुरस्कार सोहळ्याचे मीडिया पार्टनर असणार आहेत.

या गौरवामुळे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नवोदित पत्रकारांना नवी प्रेरणा मिळेल, अशी भावना प्रतिक गंगणे यांनी व्यक्त केली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026