एयर इंडियातर्फे १८ ऑगस्टपासून बेंगळुरू आणि लंडन गॅटविकदरम्यान नॉन- स्टॉप सेवा

एयर इंडियातर्फे १८ ऑगस्टपासून बेंगळुरू आणि लंडन गॅटविकदरम्यान नॉन- स्टॉप सेवा

या सेवेमुळे इंग्लंडमधील एयर इंडियाचे अस्तित्व आणखी मजबूत होणार असून पर्यायाने भारत व इंग्लंडमधील आर्थिक तसेच सांस्कृतिक संबंध आणखी मजबूत होण्यास हातभाल लागेल.

एयर इंडिया बेंगळुरू आणि लंडन गॅटविकदरम्यान दर आठवड्याला 5x सेवा दिली जाणार असून पर्यायाने लंडन गॅटविकपर्यंतची कंपनीची एकूण सेवा दर आठवड्याला 17x पर्यंत जाईल.

कंपनीतर्फे या मार्गावर बोईंग ७८७ तैनात केले जाणार असून त्यातील बिझनेस क्लासमध्ये १८ फ्लॅट बेड्स आणि इकॉनॉमीमध्ये २३८ प्रशस्त सीट्सचा समावेश असेल.

‘प्रवाशांना बेंगळुरू आणि लंडन गॅटविकदरम्यान सोयीस्कर आणि नॉन- स्टॉप सेवा उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. या नव्या मार्गामुळे या दोन्ही ठिकाणांदरम्यानची औद्योगिक आणि पर्यटनासाठीची वाढती मागणी पूर्ण करता येईल. त्याचप्रमाणे यातून जागतिक नेटवर्क आणखी मजबूत करण्याची आमची बांधिलकी पूर्ण झाली आहे,’ असे एयर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले.

SCHEDULE OF FLIGHTS BETWEEN BENGULURU AND LONDON GATWICK
Effective 18 August 2024
Flight # Sector Departure Arrival Days of Operation
AI177 Bengaluru-London Gatwick 1305 Hrs 1905 Hrs Mon, Wed, Thu, Fri, Sun
AI178 London Gatwick-Bengaluru 2035 Hrs 1050 Hrs (+1) Mon, Wed, Thu, Fri, Sun

सर्व वेळा स्थानिक आहेत. (+1) दुसर्या दिवशीचे आगमन सूचित करते.

सर्व विमानसेवांसाठीचे बुकिंग सर्व चॅनेल्सवर उपलब्ध असून त्यात एयर इंडियाचे अधिकृत संकेतस्थळ, (www.airindia.com), मोबाइल अप आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंट्स व भागिदारांचा समावेश असेल.

एयर इंडियाद्वारे सध्या चार इतर भारतीय शहरांतून लंडन गॅटविकपर्यंत सेवा दिली जाते व त्यात अहमदाबाद, अमृतसर, गोवा आणि कोची यांचा समावेश आहे. त्याशिवाय कंपनीद्वारे लंडन हिथ्रो येथे आठवड्याला 31x आणि बर्मिंगहॅम येथे आठवड्याला 6x सेवा दिली जाते.