इंडिया यामाहा मोटर प्रायव्हेट लिमिटेडने (आयवायएम) आपल्या सध्या चाललेल्या खिळवून ठेवणाऱ्या ब्रॅण्ड अभियानाखाली पुण्यात आज ‘द कॉल ऑफ द ब्लू’ (सीओटीबी) हा सप्ताहांत उपक्रम आयोजित केला. वारजे येथील आरएमडी सिंहगड कॉलेज हे स्थळ 1000 यामाहा चाहत्यांच्या उत्साहाने उपस्थित होते. यामध्ये ब्लू स्ट्रीक्स समुदायाचाही सहभाग होता. या असामान्य सोहळ्यात भाग घेण्यासाठी सगळे एकत्र जमले होते.
या सोहळ्याच्या निमित्ताने यामाहाच्या चाहत्यांना ब्रॅण्डच्या अव्वल दर्जाच्या टू-व्हीलर्सचा अनुभव प्रत्यक्ष घेण्याची मुभा मिळाली. या वाहनांमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच कामगिरी व सुरक्षितताविषयक सुविधांवर यामध्ये प्रकाश टाकण्यात आला. शिवाय, जिमखाना राइड व वूडन प्लांक चॅलेंज यांसारख्या उपक्रमांमुळे सहभागी झालेल्यांनाही त्यांची कौशल्ये दाखवण्याची आणि त्यांच्या क्षमता अधिक सफाईदार करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञांकडून सूचना प्राप्त करण्याची संधी मिळाली. या आंतरक्रियात्मक व्यासपीठामुळे सोहळ्याला उपस्थित राहिलेल्यांमध्ये सहकार्याची व समुदायाची भावना रुजवण्यात मदत झाली, यामाहा आणि मोटरसायकलिंग यांवरील प्रेमाने त्यांना परस्परांशी जोडले.
यामाहाच्या लोकप्रिय बाइक्सच्या प्रदर्शनासोबतच रायडिंगच्या चाहत्यांना सुपरस्पोर्ट-आर3 आणि हायपर-नेकेड एमटी-03 बाइक्सच्या भारावून टाकणाऱ्या अनुभवाची मेजवानीही देण्यात आली. यामाहाच्या इंडियाच्या उत्पादनश्रेणीत या दोन नवीन उत्पादनांची भर पडली आहे. ही दोन्ही उत्पादने आपापल्या प्रवर्गांमधील कामगिरी व शैलीचे मापदंड नव्याने प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहेत. उपस्थितांनी एक्सक्लुजिव ब्रॅण्ड ॲक्सरसाइज व कपडे बघण्यापासून ते बायकर्स कॅफेच्या वातावरणाचा आनंद लुटण्यापर्यंत अनेक प्रकारचे अनुभव या सोहळ्यामध्ये घेतले. ‘गेमिंग झोन’ हे सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य होते. यात उपस्थितांनी थरारक मोटोजीपी शर्यत ट्रॅक्सवर लावण्याचा आभासी (व्हर्च्युअल) अनुभव घेतला. त्यामुळे सोहळ्याचा रोमांच व आकर्षकता आणखी वाढली.
कंपनी अशाच प्रकारचे सोहळे संपूर्ण वर्षभर भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये घेणार आहे. ग्राहकांच्या जीवनशैलीचा एक भाग म्हणून रायडिंग संस्कृतीला उत्तेजन देण्याप्रती ब्रॅण्डच्या बांधिलकीबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. ‘द कॉल ऑफ द ब्लू’ वीकेण्ड ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून भारतभरातील अधिकाधिक ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याचे आणि आपली आकर्षक उत्पादन श्रेणी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचेही लक्ष्य यामाहापुढे आहे.