पुणे – धूलिवंदन आणि रंगपंचमी या मानवी साखळीद्वारे प्रबोधन करत खडकवासला जलाशयाचे २२ व्या वर्षीही होणारे प्रदूषण रोखण्यात १०० टक्के यश !दिवशी आयोजित केले जाणारे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ सलग २२ व्या वर्षीही शतप्रतिशत यशस्वी झाले. महाराष्ट्राला पाणी टंचाईचे संकट भेडसावत असतांना या मोहिमेला विशेष महत्त्व आहे. हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान २५ मार्च या दिवशी राबवण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून नागरिकांचे प्रबोधन केले आणि त्यांना धरणामध्ये उतरू दिले नाही.
पुणे शहराला पाणी पुरवठ्या करणार्या चार धरणांपैकी खडकवासला या धरणात १.१९ टीएमसी पाणी साठा आहे. त्यामुळे त्यातून पुण्याची तहान भागवली जाते. धूलिवंदन वा रंगपंचमी यांमुळे हे पिण्याचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून ही समाजहितकारी चळवळ २२ वर्षे राबवली जात आहे.
धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे, हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवणे, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रारंभीपासून प्रबोधन करत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या प्रतीमा पुजनाने अभियानाला प्रारंभ झाला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांनी नारळ वाढवून अभियानाचे उद्घाटन केले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. जालिंदर सुतार, उद्योजक श्री. अशोक कडू, व्यापारी संघटनेचे श्री. सारंग राडकर, पांडे गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. भानुदास खुटवड, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांसह अन्य मान्यवर आणि १५० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
३० मार्चच्या अभियानात सहभागी व्हा !
प्रबोधनानंतर अनेक नागरिकांनी अभियानाचे विशेष कौतुक केले. पुणे, पिंपरी चिंचवड, भोर, सासवड अशा विविध भागांतून ४० हून अधिक ग्रामस्थ, धर्मप्रेमीही उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी झाले. पोलीस-प्रशासनाचेही या अभियानाला उत्तम सहकार्य लाभले. पाटबंधारे विभागाच्या वतीने धरण परिसरात सूचनात्मक फलक लावण्यात आले होते. अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे ३० मार्चलाही हे अभियान राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.