पुणे, मार्च, 2024: नाईट फ्रॅंक इंडियाने त्यांच्या ताज्या परीक्षणांमध्ये पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राच्या नोंदण्यांमध्ये एकूण 17,570 ची लक्षणीय आकडेवारी गाठली ज्यातून मागील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत 2024 च्या फेब्रुवारीत 23% ची वाढ दिसून आली. महिन्याच्या मुद्रांकशुल्क संकलनामध्ये रू. 620 कोटींची भर पडली ज्यातून वर्षानुरूप 20% वाढ दिसून आली. व्यवहारांमधील ही लक्षणीय वाढ पुण्यामध्ये गृहखरेदी करणार्या ग्राहकांमधील आत्मविश्वास दर्शवते ज्यासाठी परवडणारे दर आणि मालमत्तांची मालकी मिळवण्याच्या दृष्टीने असलेला सकारात्मक दृष्टीकोन कारणीभूत ठरतो.
फेब्रुवारी 2024 मध्ये रू. 50 लाख आणि रू. 1 कोटी किंमतीच्या निवासी मालमत्तांच्या नोंदणी संख्येतील वाढ ही सर्वाधिक होती जी सर्व गृहखरेदी व्यवहारांच्या 32% इतकी होती, तर रू. 25 लाख आणि 50 लाख रूपयांदरम्यानच्या किंमतीच्या मालमत्तांनी फेब्रुवारी 2024 मध्ये नोंदणी झालेल्या मालमत्तांपैकी 30% चा वाटा नोंदवला. रू. 25 लाखांपेक्षा कमी किंमतींच्या घरांनी देखील फेब्रुवारी 2023 मध्ये दिलेल्या 16% च्या आकडेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये हा वाटा वाढून 22% वर गेला आहे.
रू.1 कोटी आणि अधिक किंमतींच्या मालमत्तांच्या उच्च मूल्य श्रेणीतील मालमत्तांच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आणि एकूण बाजारातील हिस्सा वाढल्याचे दिसून आले आहे. या श्रेणीतील मालमत्तांचा हा वाटा फेब्रुवारी 2023 मधील 10% च्या तुलनेत फेब्रुवारी 2024 मध्ये वाढून 14% वर गेला, ज्यातून या किंमत श्रेणीमधील मालमत्तांच्या खरेदीच्या प्राधान्यामध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले.
नाईट फ्रॅंक इंडियाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक शिशिर बैजल म्हणाले की, “पुण्यातील रिअल इस्टेटची बाजारपेठ ही गृहमालकी, परवडणारे दर आणि सहाय्यकारी उद्योगक्षेत्राच्या उपस्थितीमुळे सातत्त्याने वाढ दर्शवते आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये नोंदणीमध्ये वर्षानुरूप 23% ची घसघशीत वाढ दिसून आली ज्यातून वर्षाची आशादायी सुरूवात दिसून येते. मोठ्या आकाराच्या मालमत्तांना मिळणार्या प्राधान्यामध्ये दिसून येत असलेली वाढ ही पुण्याच्या रिअल इस्टेट बाजारपेठेचे वैविध्यपूर्ण वातावरण अधोरेखित करते. सध्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधांमधील सुधारणा आणि आर्थिक विकासासोबत पुण्याच्या निवासी मालमत्ता बाजारपेठेचा पाया अधिकाधिक भक्कम बनतो आहे ज्यातून रिअल इस्टेट क्षेत्राला नवी झळाळी मिळण्यास मदत होते आहे”.