ऑटोरिक्षा चालकांसाठी डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे, यांनी आयोजित केले मोफत किडनी आरोग्य तपासणीचे शिबीर

22 मार्च 2024, पुणे: जागतिक किडनी दिनाचे औचित्य साधून त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांनी शहरातील ऑटोरिक्षा चालकांसाठी मोफत किडनी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ) डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र-कुलपती आणि डॉ. यशराज पाटील, विश्वस्त आणि खजिनदार यांच्या नेतृत्वाखाली २२ मार्च २०२४ रोजी हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

अलीकडील अभ्यासानुसार, ऑटोरिक्षा चालकांना आरोग्याचे अनेक जोखीम घटक असतात ज्यामुळे त्यांना क्रोनिक किडनी डिसीज (CKDs) होण्याची शक्यता असते, त्यातील किडनी स्टोन हा सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. या चिंताजनक समस्येबद्दल जनजागृती करणे अत्यावश्यक आहे आणि त्याच हेतूने, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांनी रिक्षा चालकांसाठी मोफत किडनी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ) खजिनदार आणि विश्वस्त डॉ. यशराज पाटील म्हणाले, “एक आरोग्य संस्था या नात्याने, संपूर्ण समाजात सर्वांगीण वैद्यकीय सेवा देण्याकडे आमचा कल आहे आणि हे मोफत किडनी आरोग्य तपासणी शिबिर त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. किडनीच्या आरोग्याबाबत विशेषत: असुरक्षित घटकांमध्ये जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. ऑटोरिक्षा चालकांना वातावरणातील विविध कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे त्यांच्यासाठी किडनीच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील प्रत्येक घटकाच्या हातात हात घालून चालत राहण्यासाठी आणि आपल्या नागरिकांना निरोगी जीवनाकडे नेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”