पुणे, २१ मार्च २०२४ : देशातील अग्रगण्य नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड ने आपल्या नवीन सुपर बाईक कर्ज योजनेची अधिकृत घोषणा केली आहे. नवीन सुपर बाईक साठी ६० महिन्यांपर्यंतच्या कालावधीसह ५.९९ टक्क्यांपासून सुरू होणाऱ्या स्पर्धात्मक व्याजदराने कर्ज मिळू शकते.
- ६० महिन्यांपर्यंतच्या मुदतीसह २० लाख रुपयापर्यंतचा कर्जनिधी देणार
- सर्व सुपर बाईक ओरिजिनल इक्विपमेंट उत्पादकांसाठीही योजना लागू राहणार
- आगामी ३-५ वर्षांमध्ये याविभागात सुमारे १५-१८ टक्के चक्रवाढ वार्षिक दरानेवाढीची अपेक्षा
अनुभवी, दिग्गज अथवा मोटरसायकलच्या जगात नवखे असलेल्या दुचाकीस्वारांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी एलटीएफएचने प्रामुख्याने सुपर बाईक कर्जे योजनेची आखणी केलेली आहे. सदर योजना वित्तपुरवठा पर्यायांची विस्तृत श्रेणी दुचाकीस्वारांना प्रदान करते. याचबरोबर स्पर्धात्मक व्याजदर, सोयीस्कर परतफेडीच्या अटींसह हे कर्ज दिले जात आहे. तसेच वैयक्तिक ग्राहक सेवा प्रदान केली जात असल्याने ग्राहकांसाठी अखंड आणि त्रासविरहीत अनुभव सुनिश्चित होतो.
नवीन योजनेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना एलटीएफएचचे अर्बन फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गरयाली म्हणाले, एलटीएफएचमध्ये, आम्ही उच्च-कार्यक्षमता असलेल्या मोटरसायकलची मालकी केवळ वाहतुकीसाठी नव्हे तर जीवनशैलीची निवड, आवड आणि एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रकटीकरणे होय, अशी धारणा आहे. आमची कर्जे कोणत्याही मेक किंवा मॉडेलसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे देशभरातील ग्राहक या अनोख्या संधीचा लाभ घेऊ शकतील. रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमधील सुधारणा आणि ग्राहकांची वाढलेली क्रयशक्ती यामुळे सुपर बाईक विभागातील लक्षणीय वाढ संभव असल्याचा आमचा अंदाज आहे. सुपर बाईक हा एक किफायतशीर व्यवसाय विभाग आहे आणि पुढील ३-५ वर्षांमध्ये वार्षिक १५-१८ टक्के चक्रवाढ पध्दतीने (सीएजीआर) वाढेल, अशी आमची अपेक्षा आहे. शिवाय, आमची योजना देशभरात उपलब्ध असताना, मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, पुणे, हैदराबाद, चेन्नई आणि कोची यांसारख्या बाजारपेठांमध्ये आमच्या कर्ज योजनेला मागणी वाढेल, अशी आमची अपेक्षा आहे.