नेटबॉल स्पर्धा : खेळाडूंनी वाहिली अजितदादांना श्रद्धांजली; महाराष्ट्र संघाने जिंकलेले सुवर्णपदक अजितदादा पवार यांना समर्पित

By: Editor_Pratik

On: Tuesday, February 3, 2026 4:37 AM

Google News
Follow Us

नांदेड : पुणे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशन आणि नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५–२६ या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय नेटबॉल स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या तिन्ही वयोगटातील संघांनी दैदिप्यमान कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली. ही तिन्ही सुवर्णपदके दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून समर्पित करण्यात आली.

दि. २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत श्री गुरुग्रंथ साहिब भवन मैदान, गुरुद्वारा परिसर येथे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. देशभरातून आलेल्या शालेय संघांनी खेळातील शिस्त, संघभावना आणि कौशल्याचा उत्कृष्ट प्रत्यय दिला.

निकालांची झलक

१४ वर्षे मुले : प्रथम – महाराष्ट्र | द्वितीय – मध्यप्रदेश | तृतीय – विदयाभारती

१४ वर्षे मुली : प्रथम – महाराष्ट्र | द्वितीय – कर्नाटक | तृतीय – हरियाणा

१७ वर्षे मुली : प्रथम – महाराष्ट्र | द्वितीय – राजस्थान | तृतीय – गुजरात

महाराष्ट्र संघाची दमदार कामगिरी

१४ वर्षे मुले : कार्तिक वाघ, निखिल राजपूत, यश पांडे, राज वाघ, साहिल मुलानी, साई गजभारे, अनमोल जाधव, विरोचन शिंदे, अनिरुद्ध लंगोटे, आयुष येरणे, धनुष झावरे.

१४ वर्षे मुली : भावना गावडे, सृष्टी गायकवाड, वेदिका तनपुरे, मोहिनी पडोळे, नंदिनी जगदेवे, अनुष्का गायकवाड, गीता कांबळे, ऋतुजा वाघ, समृद्धी पवार, दुना दापले, रोशनी बनसोडे, रक्षिता बकवाड.

१७ वर्षे मुली : अक्षता कोकणे, विशालाक्षी राठी, नेत्रा कांसरा, अनुष्का चामलाटे, पूर्वश्री वाघ, सई इजाते, कविता नाईक, कुशो हलमारे, अचिनी तांबारे, जिज्ञासा चौहाण, जान्हवी आघाव, ईशा पाटील.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोंटीसिंग होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी (नांदेड), एस.जी.एफ.आय. निरीक्षक जयकुमार टेंभरे, महाराष्ट्र नेटबॉल संघटना अध्यक्ष सतिश इंगळे, तालुका क्रीडा अधिकारी विजय काकडे, नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे सचिव प्रवीण कुपटीकर, एस.जी.एफ.आय. क्षेत्र अधिकारी प्रीती यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रेरणादायी श्रद्धांजली

स्पर्धेच्या समारोपावेळी खेळाडूंनी जिंकलेली सुवर्णपदके दिवंगत अजितदादा पवार यांना समर्पित करत त्यांच्या क्रीडाप्रेमी कार्याची आठवण जागवली. “खेळातून शिस्त, एकजूट आणि राष्ट्रनिर्मितीची ऊर्जा मिळते,” असा संदेश या भावनिक क्षणातून देण्यात आला.

नांदेड शहरात झालेल्या या स्पर्धेमुळे शालेय क्रीडाक्षेत्राला नवी दिशा मिळाली असून, महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

October 12, 2026

October 11, 2026

October 9, 2026

October 9, 2026

October 9, 2026

October 9, 2026