पुणे, मार्च २०२४: ब्रिटानिया या भारतातील आघाडीच्या बिस्किट ब्रॅण्डने मोहिम सुरू केली आहे, जी भारतातील लोकप्रिय खेळ क्रिकेट व्यतिरिक्त असलेल्या इतर खेळांप्रती आवड जोपासण्यास प्रेरित करते. ब्रिटानियाने भारतासाठी नवीन दृष्टिकोनाची संकल्पना आखण्याकरिता टॅलेंटेड एजन्सी ला रिक्रूट केले. हा दृष्टिकोन सर्वसमावेशक असण्यासह आशादायी आहे आणि हे जेएसडब्ल्यू स्पोर्टससोबतच्या सहयोगाने करण्यात आले. यामधून त्यांची नवीन मोहिम हॅशटॅग हंग्री फॉर गोल्ड उदयास आली, ज्यामध्ये विविध क्रीडा, लिंग व देशभरातील राज्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भारतातील सहा प्रतिष्ठित नीरज चोप्रा,लवलिना बोर्गोहेन, सत्विकसाईराज रांकरेड्डी, चिराग शेट्टी,भवानी देवी आणि अविनाश साबळे ह्या ॲथलीट्सचा समावेश आहे.
हॅशटॅग हंग्री फॉर गोल्ड मध्ये ब्रिटानियाच्या सहा सर्वात मोठ्या बिस्किट ब्रॅण्ड्ससोबतच्या सखोल ऑन-पॅक सहयोगाचा समावेश आहे, जेथे ग्राहक स्कॅन करत ॲथलीट्सने प्रतिनिधीत्व केलेले भालाफेक, बॉक्सिंग, बॅडमिंटन इत्यादी सारखे विविध गेम्स खेळू शकतात. ‘ब्रिटानिया खाओ, पॅरिस जाओ’ या थीमभोवती केंद्रित असलेली ही मोहिम या गेम्सच्या लीडरबोर्डमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या ग्राहकांना पॅरिसला जाण्याची संधी देते. दोन महिने राबवण्यात येणाऱ्या मोहिमेचा डिजिटल, सोशल, ओटीटी, सीटीव्ही, ओओएच आणि इतर विविध व्यासपीठांच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत आहे.
ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमुख विपणन अधिकारी अमित दोशी म्हणाले, ”मला आमची नवीन विपणन मोहिम ‘हंग्री फॉर गोल्ड’चे अनावरण करताना आनंद होत आहे. क्रिकेट अधिक लोकप्रिय असलेल्या देशामध्ये आमचा व्यक्तींना क्रिकेट व्यतिरिक्त इतर क्रीडांप्रती आवड जोपासण्यास प्रेरित करण्याचा मनसुबा आहे. सहा उल्लेखनीय ॲथलीट्ससोबत सहयोग करत आणि सर्वसमावेशक गेमिंग प्रमोशन करत आम्ही त्यांचा उल्लेखनीय प्रवास दाखवण्यासोबत बॅडमिंटन, भालाफेक, स्टीपलचेस अशा खेळांप्रती आवड जोपासण्यास चालना देण्याचा आमचा मनसुबा आहे. लाखो भारतीयांपर्यंत आमची पोहोच वाढवत आमचा प्रत्येक भारतीयांमध्ये अभिमान जागृत करण्याचा आणि सर्व क्रीडाप्रकारांमध्ये विजय संपादित करण्याप्रती महत्त्वाकांक्षा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.”
जेएसडब्ल्यू स्पोर्टसचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्यांशू सिंग म्हणाले, ”जेएसडब्ल्यू स्पोर्टसमध्ये आम्ही जवळपास दशकापासून उदयोन्मुख व क्रिकेट व्यतिरिक्त क्रीडांना प्रकाशझोतात आणण्यामध्ये अग्रणी आहोत.
टॅलेंटेडच्या क्रिएटिव्ह पर्ल ॲलेक्स म्हणाल्या, ‘भारतातील जाहिरात क्षेत्रामधील माझ्या सहकाऱ्यांना मान्य असेल की वर्षातून किमान तीन महिने मेन्स क्रिकेटप्रती मोहिमांना पाठिंबा दिला पाहिजे. यासंदर्भात काही दुर्मिळ बाबी देखील आहे, ज्या रेट्रो-फिटनुसार नाही तर डिझाइननुसार सर्वसमावेशक व वैविध्यपूर्ण आहेत. आमच्या सहयोगामधून अनेक भारतीयांसोबत चर्चा करण्याचा अनुभव आव्हानात्मक राहिला आहे.”