स्टार हेल्थतर्फे गिफ्ट ‍सिटी शाखेच्या माध्यमातून  डॉलर डिनॉमिनेटेड इन्शुरन्सची घोषणा

पुणे, मार्च २०२४:   स्टार हेल्थ ॲन्ड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या  भारतातील सर्वांत मोठ्या रिटेल हेल्थ इन्शुरन्स फर्म तर्फे आज घोषणा करण्यात आली की त्याना आयएफएससीए कडून आयएफएससी इंटरनॅशनल ऑफिस (आयआयओ) सुरु करण्याची नोंदणी प्राप्त झाली असून त्यांचे हे ऑफिस गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी ( गिफ्टसिटी) येथे असेल.कंपनी तर्फे गिफ्ट सिटी येथील त्यांचे हे कार्यालय मार्च २०२४ च्या शेवटी सुरु करण्याची योजना आहे. या  धोरणात्मक निर्णयामुळे स्टार हेल्थ इन्शुरन्स ला आता आंतरराष्ट्रीय आर्थिक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासह जगभरांतील भारतीय समुदायाला यूएस डॉलर्स मध्ये आरोग्य विमा सेवा देणे शक्य होणार आहे.

गिफ्ट ‍सिटी मधील इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर मधील स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या अस्तित्वामुळे कंपनीला जगभरांत आपले अस्तित्व आणि व्यवसाय वाढवता येणार आहे.  कंपनी कडून आता अनिवासी भारतीयांवर लक्ष केंद्रित करुन जगभरांतील भारतीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादने उपलब्ध करुन देता येणार आहेत.  स्टार हेल्थ इन्शुरन्सला आता रिइन्शुरर म्हणूनही व्यवसाय वाढवता येणार आहे.  कंपनी तर्फे जे भारतीय परदेशात जाणार आहेत त्यांना आणि सातत्याने वाढणार्‍या आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांना सेवा देता येणार आहे.  कंपनी तर्फे आर्थिक वर्ष २५ पर्यंत आंतररष्ट्रीय इन्शुरन्स उत्पादनांची श्रेणी ही टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येणार आहे.  गिफ्ट सिटी हा प्रकल्प राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प असून तो भारताच्या ग्रोथ स्टोरी चा एक महत्त्वपूर्ण भाग ठरला आहे.

स्टार हेल्थ इन्शुरन्स चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  आनंद रॉय म्हणाले की  “ गुणवत्तापूर्ण वाढीच्या आमच्या प्रवासात आम्ही आणखी ऐक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आमच्या वाढीच्या योजने मध्ये हे एक महत्त्वाचे पाऊल असून यामुळे आमची पोहोच आता भारतीय सीमेपार जाऊन अनिवासी भारतीयांना (एनआरआय)ज आणि जागतिक स्तरावरील लोकांना आमची आरोग्य विमा उत्पादने उपलब्ध होतील. आमच्या हेल्थकेअर पार्टनर्सच्या मोठ्या नेटवर्क चा लाभ घेऊन आम्ही आमच्या पॉलिसीधारकांना अजोड सेवा देण्यास समर्थ आहोत.”