श्रीराम फार्म सोल्युशन्सने शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी अत्याधुनिक बियाणे, पीक संरक्षण व पीक पोषण उत्पादने सादर केली

By: Editor_Manas

On: Wednesday, June 17, 2026 3:56 PM

Google News
Follow Us

छत्रपती संभाजीनगर ,१७ जून २०२६ : डीसीएम श्रीराम लिमिटेडचा एक विभाग असलेल्या श्रीराम फार्म सोल्युशन्सने आपली अत्याधुनिक पीक संरक्षण, विशेष वनस्पती पोषण (स्पेशालिटी प्लांट न्यूट्रिशन) तसेच संशोधनाधारित बियाणे उत्पादने बाजारात सादर केली.

आपला पीक संरक्षण उत्पादन पोर्टफोलिओ अधिक बळकट करण्यासाठी कंपनीने श्रीराम सेनकुशा, श्रीराम एडेलॉन आणि श्रीराम झारविन ही तीन नवीन उत्पादने सादर केली. भारतीय शेतकऱ्यांपर्यंत जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या श्रीरामच्या वचनबद्धतेचे हे द्योतक आहे. ही प्रभावी उत्पादने जागतिक नवोन्मेषकांच्या पेटंटप्राप्त तंत्रज्ञानाच्या आधारे काळजीपूर्वक विकसित करण्यात आली असून, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पिकांमध्ये आढळणाऱ्या कीड, किडी व रोगांपासून प्रभावी संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. श्रीराम सेनकुशा हे जपानी तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण उत्पादन असून, उच्च मूल्याच्या शेतपिके व फलोत्पादन पिकांमधील प्रमुख लेपिडॉप्टेरन अळ्या तसेच थ्रिप्सच्या प्रभावी नियंत्रणासाठी विकसित करण्यात आले आहे.

केवळ १ दिवसांच्या प्री-हार्व्हेस्ट इंटरव्हल सह विकसित केलेले हे उत्पादन किडींमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याचा धोका कमी करण्यास मदत करते. याची ट्रान्सलॅमिनार क्रिया आणि फवारणीनंतर अवघ्या ३० मिनिटांत पावसाचा परिणाम सहन करण्याची क्षमता पिकांना प्रभावी संरक्षण प्रदान करते, ज्यामुळे पिकांची निरोगी वाढ होऊन उत्पादनात वाढ होते. हे उत्पादन विविध प्रकारच्या तणांचे व्यापक नियंत्रण प्रदान करते आणि मका पिकातील तण व्यवस्थापन उपाययोजना अधिक प्रभावी करण्यास मदत करते.

यावेळी श्रीराम फार्म सोल्युशन्सचे कार्यकारी संचालक व व्यवसाय प्रमुख संजय छाब्रा म्हणाले, “श्रीराम फार्म सोल्युशन्समध्ये नवोन्मेष आमचे ध्येय नाही, आम्ही सेवा देत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिलेले आमचे वचन आहे. या नव्या उत्पादनांचे लोकार्पण आधुनिक शेतीच्या क्षमतांना नव्याने परिभाषित करण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अत्याधुनिक बियाणे, पीक संरक्षण आणि पीक पोषण उपाय थेट शेतकऱ्यांच्या हातात देऊन आम्ही त्यांना केवळ अधिक चांगली पिके घेण्यासाठी नव्हे, तर अधिक उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सक्षम करत आहोत.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026

June 17, 2026