हल्दीरामच्या मिक्सचरमध्ये कोळी आढळल्याचा पुण्यातील ग्राहकाचा दावा; FDAकडे कारवाईची मागणी

By: Editor_Manas

On: Tuesday, October 27, 2026 3:08 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी मानस : वारजे परिसरातील रहिवासी कैवल्य पेठकर यांनी खरेदी केलेल्या हल्दीराम्सच्या ‘मिक्सचर फरसाण’च्या पॅकेटमध्ये कोळी आढळल्याचा दावा केला आहे. या प्रकाराची अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गांभीर्याने दखल घेऊन संबंधित उत्पादनाची तपासणी करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पेठकर यांनी केली आहे.

पेठकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी हल्दीराम्सचे मिक्सचर फरसाण खरेदी केले होते. त्यांचा मुलगा हे पॅकेट उघडण्यासाठी त्यांच्याकडे घेऊन आला. पॅकेट उघडण्यापूर्वी त्यांनी त्यातील पदार्थ पाहिला असता त्यामध्ये कोळ्यासारखा दिसणारा कीटक आढळून आला. त्यामुळे त्यांनी हे खाद्यपदार्थ सेवन केला नाही.

“मुलाने पॅकेट उघडण्यासाठी माझ्याकडे दिले. सुदैवाने मी ते खाण्यापूर्वी पाहिले आणि त्यामध्ये कोळी असल्याचे माझ्या निदर्शनास आले. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, अशा प्रकारे खाद्यपदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचत असतील तर अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो,” असे कैवल्य पेठकर यांनी सांगितले.

या घटनेची अन्न व औषध प्रशासनाने चौकशी करून संबंधित उत्पादनाचा नमुना तपासावा, उत्पादनाची बॅच व निर्मिती प्रक्रियेची पाहणी करावी तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित कंपनीविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन FDAने कारवाई करावी, अशी अपेक्षा पेठकर यांनी व्यक्त केली आहे.

सविस्तर विडिओ लिंक :- https://www.youtube.com/shorts/a7XpCNY2beE

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

October 27, 2026

October 27, 2026

October 27, 2026

October 27, 2026

October 27, 2026

October 27, 2026