मुंबई / नागपूर, २७ ऑक्टोबर २०२६: क्रिसाला डेव्हलपर्स या पुणे आणि पीसीएमसीमधील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपरने हिरानंदानी कम्युनिटीजसोबत सहयोगाने गोल्फ लाइफस्टाइल टाउनशिप प्रकल्पासह नागपूरमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. मध्य भारतातील सर्वात उत्कृष्ट आणि नागपूरमधील पहिली लक्झरी गोल्फ कोर्स टाउनशिप मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पातून जवळपास २१०० कोटी रुपयांच्या संभाव्य महसुलाचा अंदाज आहे.
प्रीमियम लाइफस्टाइल डेस्टिनेशन म्हणून नियोजित करण्यात आलेली ही टाउनशिप निओ-क्लासिकल डिझाइन थीम, विस्तीर्ण हिरवागार परिसर आणि एकात्मिक गोल्फ कोर्स-आधारित जीवनशैलीचा अनुभव एकत्र आणेल. नागपूरमधील सर्वात मोठ्या गोल्फ कोर्सेसपैकी एक म्हणून नियोजित असलेला हा गोल्फ कोर्स या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य ठरेल, जे प्रीमियम राहणीमानासाठी अद्वितीय परिसर तयार करेल. या टाउनशिपमध्ये ५१ अल्ट्रा-लक्झरी प्लॉट्स देखील असतील, जे नागपूरच्या दीर्घकालीन विकास क्षमतेचा लाभ घेण्यासाठी एचएनआय आणि युएचएनआय यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
नागपूर शहरी विकासाच्या एका निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असताना ही टाउनशिप लक्झरीचे अधिक वैशिष्ट्यपूर्ण रूप सादर करते, जिथे गोल्फ-केंद्रित जीवन, विस्तीर्ण हिरवळ आणि शाश्वत वास्तुकलेचा संगम आहे. वैशिष्ट्याइतकेच स्वतःच्या वेगळेपणाचे महत्त्व वाटते अशा व्यक्तींसाठी डिझाइन करण्यात आलेले हे प्लॉटेड रेसिडेन्सेस स्वतःच्या अटींवर वारसा घडवण्याचे स्वातंत्र्य देतात. सोबत तितक्याच काळजीपूर्वक निवडलेल्या टाउनहाउसेस आणि व्हिलांची जोडही याला मिळते. विकासाच्या पुढच्या टप्प्यावर असलेल्या या शहरात अनेक पिढ्यांसाठी उठून दिसेल अशा लँडमार्क परिसराचा भाग बनण्याची संधी हा प्रकल्प मिळवून देतो.
हिरानंदानी कम्युनिटीजचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर (सीएमडी) डॉ. निरंजन हिरानंदानी म्हणाले, “भारतातील मल्टी-मॉडल कॉरिडॉर्स आणि लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीमधील सातत्यपूर्ण गुंतवणूक देशाचा विकास आराखडा नव्याने आखत आहे. रिअल इस्टेट माध्यम त्या कनेक्टिव्हिटीचे रूपांतर आर्थिक हालचालींमध्ये करते. समृद्धी महामार्ग, मेट्रो आणि मिहानच्या पाठबळासह नागपूरमध्ये निवासी, व्यावसायिक, लॉजिस्टिक्स आणि रिटेल रिअल इस्टेटची मागणी वाढत आहे. हे क्षेत्र भारताच्या जीडीपीमध्ये जवळपास ७ टक्के योगदान देते आणि २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर्स बाजारपेठ बनण्यासाठी सज्ज आहे. बांधकाम, उत्पादन आणि सेवांशी जोडलेला देशातील सर्वात मोठा रोजगार देणारा घटक म्हणून हे विकसित भारताचे प्रमुख इंजिन आहे. आम्ही आमचा डेव्हलपमेंट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म ‘एलेव्हा बाय हिरानंदानी कम्युनिटीज’अंतर्गत क्रिसाला डेव्हलपर्सच्या सहयोगाने नागपूर प्रकल्पाचा विकास करू. यामुळे प्रादेशिक अर्थव्यवस्थेत रोजगार, गुंतवणूक आणि सामाजिक पायाभूत सुविधांची भर पडेल. यासोबत, आम्ही इंटिग्रेटेड टाउनशिप्स, पुनर्विकास, जॉइंट डेव्हलपमेंट आणि जॉइंट व्हेंचर्सच्या माध्यमातून आमचा विस्तार चालू ठेवू. रिअल इस्टेटमध्ये सर्वांसाठी एकच नियम लागू पडत नाही. वैविध्यपूर्ण मॉडेल आम्हाला प्रत्येक बाजारपेठ योग्य प्रकारे समजून घेण्यास आणि या तेजीच्या काळात सातत्याने वाढण्यास मदत करते.”
या प्रकल्पाबाबत मत व्यक्त करत क्रिसाला डेव्हलपर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. आकाश अगरवाल म्हणाले, “आमचे वाढीचे धोरण वैविध्यपूर्ण रिअल इस्टेट पोर्टफोलिओच्या निर्मितीवर केंद्रित आहे, जो गुणवत्ता, डिझाइन आणि ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांशी संलग्न राहून सर्व बाजारपेठांमध्ये विस्तारू शकेल. प्रीमियम आणि लक्झरी सेगमेंट्स पारंपारिक घरांच्या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन अधिक वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीचा अनुभव देणारे प्रकल्प उभारण्याची संधी देतात. क्रिसालासाठी नागपूरमध्ये प्रवेश करणे हे आमची भौगोलिक उपस्थिती वैविध्यपूर्ण बनवण्याच्या आणि दीर्घकालीन विकास क्षमता असलेल्या बाजारपेठांमध्ये अधिक प्रबळ पाया निर्माण करण्याच्या दिशेने धोरणात्मक पाऊल आहे. आमचा विश्वास आहे की, घरखरेदीदारांच्या बदलत्या पसंतींविषयी आमची समज आणि हिरानंदानी कम्युनिटीजचे विकास क्षेत्रातील कौशल्य यांचे संयोजन आम्हाला चिरस्थायी ब्रँड मूल्य निर्माण करण्यास आणि येत्या वर्षांत शाश्वत वाढीसाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यास मदत करेल.”
क्रिसाला डेव्हलपर्स निवासी आणि व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात आपली उपस्थिती सातत्याने दृढ करत आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये १०५ एकरची टाउनशिप ‘लँड ऑफ ड्रीम्स’ प्रकल्प, त्यानंतर वर्षभरात १०० एकरांपेक्षा जास्त जागेवर पसरलेली दुसरी टाउनशिप आणि १० लाख चौरस फुटांच्या ग्रेड ए+ व्यावसायिक प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पांमधून कंपनीचे एकात्मिक नियोजन, जीवनशैली-केंद्रित समुदाय आणि उच्च-विकास बाजारपेठांमध्ये आपला विस्तार करण्यावरील लक्ष निदर्शनास येते.





