पुणे, २७ ऑक्टोबर २०२६: डिजिटल युगात सुरक्षित संवादासाठी जगातील कोट्यवधी युजर्सचा विश्वास असलेल्या ‘ट्रूकॉलर’ने आज भारतात आपल्या विशेष नवीन ‘ट्रूकॉलर लाईट’ अॅपच्या लाँचिंगची घोषणा केली आहे. कमी स्टोरेज, मर्यादित मेमरी आणि प्रोसेसिंग पॉवर असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोन्ससाठी हे अॅप विशेष रूपाने तयार करण्यात आले आहे. अवघ्या १० एमबी आकाराचे हे अॅप क्षणात इन्स्टॉल होते, अत्यंत वेगाने उघडते आणि ४ जीबी पर्यंत रॅम असलेल्या मूलभूत अँड्रॉइड स्मार्टफोन्सवरही अत्यंत सहजतेने चालते. मोबाईलमध्ये स्टोरेज स्पेस कमी असली तरीही युजर्सना नको असलेले स्पॅम आणि फ्रॉड कॉल्स ओळखण्यासह ते ब्लॉक करण्याची मुख्य ट्रूकॉलर अॅपसारखीच भक्कम सुरक्षा आता या लाईट व्हर्जनद्वारे मिळणार आहे.
भारतातील सर्वात व्यस्त सणासुदीच्या आणि खरेदीच्या काळात हे अॅप लाँच करण्यात आले आहे. या काळात बनावट डिलिव्हरी कॉल्स, आकर्षक वाटणाऱ्या फेक ऑफर्स आणि केवायसी फसवणुकीचे सायबर स्कॅम कॉल्स अचानक वाढतात. कोट्यवधी नागरिकांसाठी त्यांचा स्मार्टफोन हा डिजिटल पेमेंट, डिलिव्हरी अलर्ट्स आणि कुटुंबाशी संपर्कात राहण्याचे मुख्य माध्यम आहे; मात्र सणांच्या दिवसांत फोटो, व्हिडिओ आणि मेसेज फॉरवर्ड्समुळे फोनमधील मेमरी स्पेस लगेच भरून जाते. युजर्सची हीच अडचण लक्षात घेऊन ट्रूकॉलरने हे मूळ अँड्रॉइड अॅप विकसित केले आहे. हे मुख्य अॅपची केवळ छोटी किंवा कट-डाउन आवृत्ती नसून, कमी मेमरी असलेल्या फोन्ससाठी अगदी मुळापासून तयार केलेले स्वतंत्र अॅप आहे. हे अॅप त्याच मुख्य ट्रूकॉलर डेटाबेस आणि डिटेक्शन सिस्टमवर आधारित असल्याने सायबर धोक्यांपासून पूर्ण रक्षण करते.
ट्रूकॉलर लाईटमध्ये युजर्सना कॉलर आयडी, स्पॅम व फ्रॉड कॉल ब्लॉकिंग, संपर्क व कॉल हिस्ट्री शोधण्यासाठी इन-बिल्ट डायलर आणि आफ्टर-कॉल स्क्रीन यांसारख्या आवश्यक सुविधा मिळतात. अॅप लहान आणि वेगवान राहावे यासाठी मेसेजिंग, व्हॉईसमेल, फॅमिली प्रोटेक्शन आणि एआय असिस्टंट यांसारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये यात समाविष्ट केलेली नाहीत. हे अॅप सध्या भारतातील गुगल प्ले स्टोअरवरून ४ जीबी पर्यंत रॅम असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध असून येत्या काही आठवड्यांत ते सर्व पात्र उपकरणांपर्यंत टप्प्याटप्प्याने पोहोचवले जाणार आहे.





