गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आयुर्वेदाला संशोधन व तंत्रज्ञानाची जोड देत हजारो रुग्णांना बरे करणाऱ्या रसायू लाईफ सायन्सेस या संस्थेच्या नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. डाॅ. सावंत यांच्या हस्ते आणि विज्ञान-तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षा व राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कर्वेनगर येथील संस्थेच्या वास्तूत झालेल्या सोहळ्यात निमंत्रक वैद्य योगेश बेंडाळे, वैद्य विनिता बेंडाळे उपस्थित होते. दीपप्रज्ज्वलन आणि धन्वंतरी पूजन व स्तवनाने कार्यक्रमाचा आरंभ झाला.
प्रा. डा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “बेंडाळे हे लोकसेवेचे व्रत घेऊन आयुर्वेदप्रणित संशोधन करत आहेत. रोगाच्या मूळाशी जाऊन विचार व उपचार करण्याची त्यांची पद्धत आणि देशविदेशांत सातत्याने आयुर्वेदप्रणित संशोधन शास्त्रशुद्ध पद्धतीने सादर करण्याचा त्यांचा उपक्रम उल्लेखनीय आहे. तसेच परवडणारी औषधे विकसित करण्याचा प्रयत्न महत्त्वाचा आहे.”
वैद्य योगेश बेंडाळे म्हणाले, “१९९६ पासून पाश्चात्त्य वैद्यकाच्या तुलनेत आयुर्वेद हे शास्त्र म्हणून कमी पडते आहे की आयुर्वेदतज्ज्ञ कमी पडत आहेत, याचा शोध घेताना, रसायू लाईफ सायन्सेसची संकल्पना रुजली. ३० वर्षांच्या अथक संशोधनातून ४५ पेक्षा जास्त पेटंट्स प्राप्त करण्यापर्यंत प्रवास झाला आहे. नुकतेच जगातले पहिले ओरल ड्रग (तोंडाने घ्यावयाचे औषध) जागतिक आरोग्य व्यासपीठावर सादर केले आहे. नव्या वास्तूमधूनही संशोधनावर भर देत निरामयतेकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न राहील.”





