पुणे काँग्रेसमध्ये मोठा बदल; शहराध्यक्षपदी प्रशांत जगताप अन् दिप्ती चवधरी यांची निवड

By: Editor_Pratik

On: Saturday, May 23, 2026 10:29 AM

Google News
Follow Us

पुणे : कॉंग्रेसने प्रथमच पुणे शहरात दोन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. माजी महापौर प्रशांत जगताप आणि विधान परीषदेच्या माजी सदस्या दिप्ती चवधरी यांच्याकडे ही धुरा दिली आहे. पक्षातील गटबाजी रोखण्याचे आव्हान असणार आहे. कॉग्रेसने बुधवारी रात्री उशिरा राज्यातील जिल्हा, शहराध्यक्षांची नियुक्ती आहे. यामध्ये पुणे शहराचे दोन विभाग केले असून, पुर्व विभागासाठी माजी महापौर जगताप आणि पश्चिम विभागासाठी चवधरी यांच्यावर शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पुणे ग्रामीण उत्तर विभागाचे अध्यक्ष म्हणून कमलाकर सातव, पुणे ग्रामीण दक्षिण विभागाचे अध्यक्ष म्हणून लहू निवंगुणे यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष पदी नरेंद्र बनसोडे यांची नियुक्ती केली आहे.

राज्यस्तरीय कार्य आणि नेतृत्वाची दखल

गेल्यावर्षी महापालिका निवडणुकीपुर्वी जगताप यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत कॉग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेल्या जगताप यांनी अल्पावधीतच कॉग्रेसचे शहराध्यक्ष पद मिळविले आहे. जगताप यांनी महापालिकेत नगरसेवक, महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी आक्रमकपणे भुमिका मांडली. तसेच त्यांचे संघटनात्मक काम उल्लेखनीय ठरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर ते शरद पवार यांच्यासोबत राहीले होते. महापालिका निवडणुकीत त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात महत्वाची भुमिका बजावली. जगताप यांच्या प्रभागात दोन जागा कॉग्रेसला मिळाल्या होत्या. राज्याच्या नेतृत्वाने जगताप यांच्यावर आता शहराध्यक्ष पदाची धूरा सोपविली आहे.

मराठा समाजाला न्याय

जगताप यांच्या निमित्ताने कॉग्रेसने मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी माजी आमदार चवधरी यांच्या नियुक्तीतून ‘ओबीसी’ वर्गाला सोबत ठेवण्याची भुमिका घेतल्याची दिसते. चवधरी यांनी महापालिकेत नगरसेविका, महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे, तसेच त्या विधान परीषदेच्या सदस्या देखील होत्या. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला काय फायदा होणार हे येणाऱ्या काळात दिसेल.

गटबाजीचा प्रत्येक निवडणुकीत फटका; काही महिन्यांपूर्वीच पक्षात प्रवेश; दावेदार नाराज

गेल्या काही वर्षांत कॉंग्रेसमधील गटबाजीने मोठ्या प्रमाणावर डोक वर काढले आहे. त्याचा फटका हा प्रत्येक निवडणुकीला बसला आहे. प्रत्येक शहराध्यक्षाला या गटबाजीला सामोरे जावे लागत आहे. आता हे आव्हान जगताप हे कसे पेलणार याविषयी उत्सुकता आहे. काही महीन्यापुर्वीच पक्षात प्रवेश केलेल्या जगताप यांची शहराध्यक्ष पदी वर्णी लागल्यामुळे मुळचे कॉंग्रेसमधील या पदाचे दावेदार नाराज होणार हे स्वाभाविक आहे. त्यामुळे ही नाराजी दुर करणे, पक्षाची संघटनात्मक बांधणी करणे, गटबाजी रोखण्याचे आव्हान जगताप यांच्यासमोर असणार आहे. त्याचवेळी महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात ते काय भुमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

May 23, 2026

May 22, 2026

May 22, 2026

May 22, 2026

May 22, 2026

May 22, 2026