अहिल्यानगरमध्ये पुतण्याच्या खूनप्रकरणी काकाला २४ तासांत अटक; १० लाखांची रोकड जप्त

By: Editor_Manas

On: Monday, May 18, 2026 9:47 AM

Google News
Follow Us

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भांडगाव येथे सख्ख्या पुतण्याचा खून करून घरातील रोकड घेऊन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. महेश हनुमंत खरमाळे (वय ४५, रा. भुजवळवस्ती, भांडगाव, ता. पारनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दहा लाख २९ हजार रुपयांची रोकड आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी सिद्धेश संदीप खरमाळे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीचे वडील संदीप खरमाळे यांचा अज्ञात व्यक्तीने घरात घुसून डोक्यात हत्याराने वार करत खून केला होता. तसेच घरातील १२ लाख ७० हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी महेश खरमाळे याच्यावर संशय बळावला. तो भांडगाव ते जामगाव रस्त्याने दुचाकीवरून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने पुतण्या संदीप खरमाळे याच्या घरात जाऊन हातोड्याने डोक्यात वार करून खून केल्याची कबुली दिली.

आरोपीकडून दहा लाख २९ हजार रुपयांची रोकड, मोबाईल फोन, दुचाकी, मृत व्यक्तीचे आधारकार्ड तसेच इतर साहित्य असा एकूण दहा लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीला पुढील तपासासाठी पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक हरिश भोये, संदीप मुरकुटे तसेच पोलिस पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

August 25, 2026

August 25, 2026

August 25, 2026

August 25, 2026

August 23, 2026

August 22, 2026