मुंबई, मे 2026: भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने आज आपल्या करंट अकाउंट खाते ग्राहकांसाठी एआय प्रणीत अनुपालन परिवर्तन उपायसुविधांचा एकात्मिक संच सादर केल्याचे जाहीर केले. व्यवसायांसाठी पारंपरिकरीत्या जटिल आणि वेळखाऊ असलेल्या नियामक प्रक्रियांना सुलभ करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. नव्या सेवांमध्ये एआय प्रणीत ReKYC उपायसुविधा आणि एआय प्रणीत डिजिटल बिझनेस प्रोफाइल अपडेट सेवा यांचा समावेश असून या दोन्ही सेवा अधिक वेगवान, अधिक अचूक आणि पूर्णपणे डिजिटल अनुपालन असलेला अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत.
डिजिटल बिझनेस प्रोफाइल अपडेट सेवा करंट अकाउंट खाते ग्राहकांना व्यवसायाचे स्वरूप असा त्यांच्या व्यवसायाशी संबंधित तपशील अखंड डिजिटल आणि पेपरलेस प्रक्रियेद्वारे सहजपणे अपडेट करण्याची सुविधा देते. जनरेटिव्ह AI आणि रिअल-टाइम GST फाइलिंग डेटाचा वापर करून ही सेवा 3,000 पेक्षा अधिक पर्यायांमधून सर्वात योग्य व्यवसाय कोड आपोआप ओळखते आणि नियुक्त करते. त्यामुळे मॅन्युअल डेटा एंट्री, कागदपत्रांची आवश्यकता किंवा शाखेला भेट देण्याची गरज राहत नाही. पूर्वी मोठ्या प्रमाणावर मॅन्युअल प्रयत्न आणि बराच वेळ लागणारी प्रक्रिया आता GST-प्रमाणित इंटेलिजन्समुळे अधिक अचूकतेसह तत्काळ पूर्ण होऊ शकते.
ग्राहकांना या सेवेमुळे अजिबात कागदपत्रांची पूर्तता करण्याची गरज राहत नाही. तत्काळ सबमिशन आणि अखंड डिजिटल सेवा अनुभव मिळतो. फ्रंटलाइन आणि ऑपरेशन्स टीमसाठी, यामुळे मॅन्युअल कामकाजात घट, कामाचा ताण कमी होणे आणि चुका कमी होणे शक्य होते. बँकेसाठी अनुपालन नियंत्रण अधिक मजबूत करत कार्यक्षमता वाढवण्यासाठी GST इंटेलिजन्ससह एकत्रित केलेल्या Large Language Models (LLMs) च्या पहिल्या मोठ्या प्रमाणावरील उपयोजनांपैकी ही एक आहे.
याचबरोबर, ॲक्सिस बँकेने बिगर वैयक्तिक करंट अकाउंट खाते ग्राहकांसाठी आपली एआय प्रणीत ReKYC उपायसुविधा देशभरात सुरू केली आहे. यामुळे पारंपरिकरीत्या मॅन्युअल, दस्तऐवज-केंद्रित आणि त्रुटी-प्रवण प्रक्रिया आता मार्गदर्शित, एआय ची मदत मिळत असलेल्या कार्यप्रवाहात रूपांतरित झाली आहे. बँकेच्या सुरू असलेल्या अनुपालन सुधारणा उपक्रमांचा भाग म्हणून सादर करण्यात आलेही ही उपायसुविधा आता संपूर्ण भारतभर लागू करण्यात आली असून, ReKYC प्रमाणातील जवळपास 90% ग्राहक संरचनांचा यात समावेश आहे.
ही उपायसुविधा प्रगत दस्तऐवज इंटेलीजन्सचा वापर करून एका PDF मध्ये सादर केलेली अनेक KYC कागदपत्रे आपोआप ओळखते, त्यांतील माहिती काढते आणि पडताळणी करते. शाखेतील वापरकर्त्यांना रिअल-टाइममध्ये म्हणजे त्या त्या वेळीच मार्गदर्शन केले जाते, तसेच डेटा एंट्रीच्या टप्प्यावरच प्रणालीकडून हरवलेली कागदपत्रे, डेटामधील त्रुटी किंवा गुणवत्तेशी संबंधित समस्या सक्रियपणे दर्शविल्या जातात. यामुळे अनुपालन प्रक्रिया प्रतिक्रियात्मक, सबमिशननंतरच्या तपासणीऐवजी सक्रिय आणि प्रतिबंधक दृष्टिकोनाकडे वळते.
प्रारंभिक निष्कर्षांनुसार, पुन्हा काम करण्याची गरज आणि फॉलो-अप्समध्ये लक्षणीय घट, जलद टर्नअराउंड वेळ आणि शाखा व ऑपरेशन्स टीमच्या उत्पादकतेत सुधारणा दिसून आली आहे. मार्गदर्शित कार्यप्रवाहांमुळे नॉट फर्स्ट टाईम राईट (NFTR) दर कमी होण्याची, फर्स्ट टाईम राईट कामगिरी सुधारण्याची आणि संपूर्ण नेटवर्कमध्ये अधिक मजबूत व विस्तारक्षम अनुपालन नियंत्रण प्रस्थापित होण्याची अपेक्षा आहे.
या सादरीकरणाबद्दल बोलताना ॲक्सिस बँकेच्या डिजिटल बिझनेस, ट्रान्सफॉर्मेशन आणि स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्सचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह समीर शेट्टी म्हणाले, “ॲक्सिस बँकेत, आमचे लक्ष कुशाग्र ऑटोमेशनच्या माध्यमातून उच्च प्रभाव असलेल्या नियामक प्रक्रियांची नव्याने पुनर्कल्पना करण्यावर केंद्रित आहे. एआय प्रणीत अनुपालन उपायसुविधांच्या सादरीकरणातून महत्त्वपूर्ण मॅन्युअल आणि त्रुटी असलेल्या प्रक्रिया अखंड, विनाअडथळा माहिती आधारित कार्यप्रवाहांनी बदलल्या जात आहेत. जनरेटिव्ह एआय, डॉक्युमेंट इंटेलीजन्स आणि रिअल-टाइम जीएसटी डेटाचे संयोजन आम्हाला मोठ्या प्रमाणावर जटिल कार्यप्रवाह सुलभ करण्यास सक्षम करते. त्यातून ग्राहकांना अधिक वेगवान, पेपरलेस अनुभव मिळतो. त्यामुळे अनुपालन आणि कामकाज लवचिकता अधिक मजबूत होते. हे सादरीकरण म्हणजे भविष्यासाठी सज्ज, एआय प्रणीत प्रणाली विकसित करून प्रत्येक व्यवसाय बँकिंग टचपॉइंटमध्ये विश्वास, पारदर्शकता आणि सोयीसुविधा वाढवण्याच्या आमच्या व्यापक उद्दिष्टातील एक महत्त्वाचे पाऊल आहे.





