नवी दिल्ली, ता. ६ मे २०२६ : Vivo ने आपल्या कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन मालिकेत नवीन भर घालत Vivo X300 FE हा स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. प्रगत ZEISS इमेजिंग, शक्तिशाली Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर आणि आकर्षक कॉम्पॅक्ट डिझाइन यामुळे हा स्मार्टफोन प्रीमियम श्रेणीत चर्चेचा विषय ठरत आहे.
१६.०४ सेमी (६.३१-इंच) फ्लॅट डिस्प्ले, ५००० निट्स ब्राइटनेस आणि ZEISS मास्टर कलर डिस्प्ले यामुळे या श्रेणीतील भारतातील सर्वात तेजस्वी स्क्रीन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. हलक्या आणि स्लिम डिझाइनसह एका हाताने सहज वापरता येईल, अशा पद्धतीने या स्मार्टफोनची रचना करण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये प्रगत ZEISS इमेजिंग तंत्रज्ञान देण्यात आले आहे. यात ५० मेगापिक्सेलचा ZEISS मुख्य कॅमेरा, ZEISS मल्टीफोकल पोर्ट्रेट सपोर्ट, १००x डिजिटल झूमसह ५० मेगापिक्सेलचा ZEISS सुपर टेलीफोटो कॅमेरा आणि AI क्रिएटिव्ह सूटचा समावेश आहे. विशेष म्हणजे, २०० मिमी समतुल्य फोकल लेंथ देणारा ZEISS टेलीफोटो एक्सटेंडर जेन २ देखील उपलब्ध करण्यात आला आहे.
परफॉर्मन्ससाठी Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर देण्यात आला असून, ६५०० mAh क्षमतेची मोठी बॅटरी ९०W वायर्ड फ्लॅशचार्ज आणि ४०W वायरलेस फ्लॅशचार्जला सपोर्ट करते.
Vivo X300 FE हा स्मार्टफोन Urban Olive, Lilac Purple आणि Noir Black या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.
किंमत आणि उपलब्धता
Vivo X300 FE च्या १२GB + २५६GB व्हेरिएंटची किंमत ७९,९९९ रुपये, तर १२GB + ५१२GB व्हेरिएंटची किंमत ८९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
याशिवाय, Vivo ZEISS टेलीफोटो एक्सटेंडर जेन २ ची किंमत १५,९९९ रुपये असून, ॲक्सेसरी किटची किंमत ३,९९९ रुपये आहे.
हा स्मार्टफोन १४ मे २०२६ पासून Flipkart, Amazon India, Vivo India ई-स्टोअर तसेच देशभरातील प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहे.
ग्राहकांसाठी खास ऑफर्स
कंपनीकडून निवडक बँक कार्डांवर १० टक्के इन्स्टंट कॅशबॅक, २४ महिन्यांचा नो-कॉस्ट EMI, झिरो डाउन पेमेंट सुविधा, ५,००० रुपयांपर्यंत अपग्रेड बोनस, एक वर्षाची मोफत विस्तारित वॉरंटी आणि जिओकडून ५०००GB डेटा लाभ देण्यात येत आहे.
याशिवाय, ‘V Shield’ वर ६० टक्के सूट आणि ७० टक्क्यांपर्यंत खात्रीशीर बायबॅकची सुविधाही ग्राहकांना मिळणार आहे.
Vivo इंडियाचे एक्स सिरीज प्रॉडक्ट मॅनेजमेंट प्रमुख Vikas Tagra यांनी सांगितले की, “आजचे ग्राहक उत्कृष्ट परफॉर्मन्ससोबत स्टायलिश आणि सहज वापरता येईल असा स्मार्टफोन शोधत आहेत. Vivo X300 FE मध्ये आधुनिक डिझाइन, प्रगत ZEISS इमेजिंग आणि फ्लॅगशिप परफॉर्मन्सचा उत्कृष्ट मिलाफ करण्यात आला आहे.”





